Home नांदेड शेल्हाळ येथील राज्यस्तरीय भजन स्पर्धेस लोकसभेचे संभाव्य भाजप उमेदवार डॉ. अनिल कांबळे...

शेल्हाळ येथील राज्यस्तरीय भजन स्पर्धेस लोकसभेचे संभाव्य भाजप उमेदवार डॉ. अनिल कांबळे यांनी लावली उपस्थिती

23
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG_20240206_082818.jpg

शेल्हाळ येथील राज्यस्तरीय भजन स्पर्धेस लोकसभेचे संभाव्य भाजप उमेदवार डॉ. अनिल कांबळे यांनी लावली उपस्थिती

लोहा प्रतिनिधि अंबादास पाटील पवार 
राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन शेल्हाळ ता. उदगीर येथे दि. ४ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. सदरील स्पर्धेस लातूर लोकसभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार डॉ. अनिल कांबळे यांनी हजेरी लावत भजन स्पर्धेतील भक्तिरासाचा आनंद घेतला.
अवघ्या कांहीं कळवधीवर येवून ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईचूक कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे. लातूर लोकसभेचे संभाव्य भाजपचे उमेदवार डॉ. अनिल कांबळे यांनी स्वतःच्या मूळ शेल्हाळ (ता. उदगीर) या गावी राज्यस्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आल्याने त्यांनी सदर स्पर्धेत हजेरी लावून भजन स्पर्धेत भक्तिरसाचा आनंद घेतला.
सदरील स्पर्धेस राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे, खा. सुधाकर श्रृंगारे, हभप भास्कर महाराज, हभप प्रशांत महाराज, हभप विठ्ठल महाराज सांडोळकर आदीसह लातूर जि. प. चे माजी सभापती बापूरावजी राठोड, मुंबई येथील नगरसेवक किरणजी लांडगे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे, तालुकाध्यक्ष शिवशंकर धुपे, भागवन पाटील तळेगावकर, प्रीतीताई भोसले, राम प्रतिष्ठानचे सतीश पाटील, रंजीत कांबळे, संतोष पाटील, रामेश्वर पाटील, साधू लोणीकर, अनिल कल्याणी, प्रा. विवेक सुकणे, उदगीरचे तहसीलदार विकास बिराजदार, गटविकास अधिकारी प्रवीण, वैभव कोयले, माधव कल्याणी सह बहुसंख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Previous articleएसटी महामंडळाची विशेष सेवा; बीडमधून प्रयागराज, काशी आणि अयोध्येपर्यंत धावणार लालपरी
Next articleजेल भरो आंदोलनातून अशा सेविकांनी केला शासनाचा निषेध.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here