Home मुंबई खास बातमी”बरे झाले गद्दार गेले, त्यांच्यामुळे हिरे सापडले; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर...

खास बातमी”बरे झाले गद्दार गेले, त्यांच्यामुळे हिरे सापडले; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर जळजळीत टीका

93
0

आशाताई बच्छाव

IMG-20230128-WA0016.jpg

“खास बातमी”बरे झाले गद्दार गेले, त्यांच्यामुळे हिरे सापडले; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर जळजळीत टीका

मनोहर देवरे (प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मालेगावमधील अद्वय हिरे यांची चर्चा राज्यभर होत आहे. त्यामागचे कारणही तसेच काहीसे आहे. कारण राज्यातील सत्ताधारी भाजपला सोडचिठ्ठी देत अद्वय हिरे यांनी ठाकरेंच्या जहाजात उडी घेतली आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी भाजपचे मालेगावातील नेते अद्वेय हिरे यांना शिवबंधन बांधले असून या घडामोडीकडे राज्याने लक्ष वेधले गेले आहे. बरे झाले गद्दार गेले. त्यांच्यामुळे हिरे सापडले. असे उद्गार उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढले आहेत. उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिंदे गटाचा तिखट समाचार घेतला असून हिरे यांचे स्वागत केले आहे.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, एक गोष्ट महाराष्ट्राच्या लक्षात आली असेल की, बरे झाले गद्दार गेले. त्यांच्यामुळे हिरे सापडले. आजवर त्यांना आम्ही खूप पैलू पाडले आणि हिरा म्हणून आम्ही त्यांना नाचवत होतो. पण ते दगड होते, ते गेले बुडाले.” शिंदे गटाचा असा तिखट समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

‘आम्ही पंचवीस तीस वर्षे भोगले. आम्ही त्यांनासुद्धा पालखीत बसवून मिरवणुका काढल्या. पण त्यांना वाटले की, आम्ही कायमचे भोई आहोत. पण आम्ही त्यांना सांगतोय की, आम्ही भाजपची नव्हे तर हिंदुत्वाची पालखी वाहण्यासाठी आहोत.’
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील लोक निवडणुकीची वाट बघत आहेत. महिनाभरात मालेगावला सभा घेवू. मोकळ्या मैदानात बोलूया. आता निवडणुका झाल्या तर सर्वे सांगतोय की, मविआला 34 जागा मिळतील पण मी म्हणतो की आपण घट्ट राहीलो तर लोकसभेच्या 40 जागा मविआला मिळतील अशी आहे. जनतेने त्रिफळाच उडवायचे ठरवले तर ४८ जागाही शिवसेनेला मिळतील. असा दावा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे.

Previous articleआरोग्य विभागातील स्त्री परिचर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची मागणी!!
Next articleनाशिक पदवीधर निवडणूक; शेवटच्या दिवशी ‘तांबे विरुद्ध शुभांगी पाटील’ प्रचाराचा धुराळा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here