Home राजकीय नाशिक पदवीधर निवडणूक; शेवटच्या दिवशी ‘तांबे विरुद्ध शुभांगी पाटील’ प्रचाराचा धुराळा

नाशिक पदवीधर निवडणूक; शेवटच्या दिवशी ‘तांबे विरुद्ध शुभांगी पाटील’ प्रचाराचा धुराळा

37
0

आशाताई बच्छाव

IMG-20230128-WA0051.jpg

नाशिक पदवीधर निवडणूक; शेवटच्या दिवशी ‘तांबे विरुद्ध शुभांगी पाटील’ प्रचाराचा धुराळा

भास्कर देवरे (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

नाशिक : पदवीधर मतदारसंघ निवडणूकीचा
आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. अगदी सुरुवातीपासून ते आतापर्यंत या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. आतापर्यंत सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत पहायला मिळत आहे. सोबतच भाजपाचा पाठिंबा मलाच असं म्हणणारे स्वराज्य संघटनेचे उमेदवार सुरेश पवार यांनी देखील या निवडणुकीत रंगत आणली आहे.
आज शेवटच्या दिवशी शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे हे दोघे उमेदवार नगर जिल्ह्यात प्रचार करणार आहेत. मात्र भाजपचा पाठिंबा कुणाला हे अद्यापही जाहीर नाहीये. भाजप पक्षाने अद्याप कुणालाही पाठिंबा जाहीर केलाच नाहीये. असं असलं तरी भाजपाचा सत्यजित तांबे यांना छुपा पाठिंबा असल्याच्या चर्चा असून या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध सत्यजित तांबे अशी थेट लढत पहायला मिळत आहे.
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची सुरुवातच

नाट्यमय झाली असून आधी शेवटच्या दिवसांपर्यंत कोणाकडूनही उमेदवार न दिल्याने गोंधळ उडाला. त्यानंतर तांबे पिता-पुत्राने गेमचेंजर ठरले. या मतदारसंघात एकामागे एक अनेक टर्न आले असून येणाऱ्या काही तासात नाशिक पदवीधर मतदारसंघात नाट्यमयत घडामोडी पाहायला मिळतील असा दावा स्वराज संघटनेच्या नेत्यांनी केला. त्यात आज प्रचाराच्या शेवटच्या दिवसात काय काय घडामोडी घडतात याकडे लक्ष लागून आहे.
भाजप स्वराज्य संघटनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे का? की तांबे यांना छुपी मदत करून कॉंग्रेसचा उमेदवार फोडला यात समाधान मानणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचा पाठिंबा मात्र एक कोडे बनला असून शुभांगी पाटील यांच्यामागे मात्र मविआने आपली संपूर्ण ताकद लावली असून त्यांनी आपल्या बाजूने वातावरण निर्मिती केली आहे. तर दुसरीकडे दोघेही उमेदवार आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी नगर जिल्ह्यात ताकत आजमावत आहेत.
भाजप स्वराज्य संघटनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे का? की तांबे यांना छुपी मदत करून कॉंग्रेसचा उमेदवार फोडला यात समाधान मानणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचा पाठिंबा मात्र एक कोडे बनला असून शुभांगी पाटील यांच्यामागे मात्र मविआने आपली संपूर्ण ताकद लावली असून त्यांनी आपल्या बाजूने वातावरण निर्मिती केली आहे. तर दुसरीकडे दोघेही उमेदवार आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी नगर जिल्ह्यात ताकत आजमावत आहेत.

Previous articleखास बातमी”बरे झाले गद्दार गेले, त्यांच्यामुळे हिरे सापडले; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर जळजळीत टीका
Next articleशाळा प्रवेशासाठी ‘आधार’ सक्ती; बनावट पटसंख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here