Home जालना विहिरीचा प्रस्ताव मंजुर करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांला आमदार नारायण कुचेची अपमानजनक वागणुक –...

विहिरीचा प्रस्ताव मंजुर करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांला आमदार नारायण कुचेची अपमानजनक वागणुक – पदवीधर तरुणाचा अपमान

33
0

आशाताई बच्छाव

IMG_20240205_211826.jpg

विहिरीचा प्रस्ताव मंजुर करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांला आमदार
नारायण कुचेची अपमानजनक वागणुक – पदवीधर तरुणाचा अपमान
तु दारु पिऊन आला का, तुझ्या अंगाचा वास येतो, अशी भाषा वापरुन तरुण
कार्यकर्त्यांचा अपमान
-आमदार नारायण कुचेवर कारवाई करा – भाजपाच्या जिल्हाध्यक्षांकडे
कार्यकर्त्यांची तक्रार
जालना, दि. ५(प्रतिनिधी दिलीप बोंडे)-बदनापुर विधानसभा मतदार संघाचे आपल्या पक्षाचे
आमदार नारायण कुचे यांच्याकडे माझी विहिरीचा प्रस्ताव मंजुर करण्यासाठी
शिफारस करण्याची विनंती केली असता आमदार यांनी मला अपमानास्पद वागणुक
देऊन अपमानित करुन हाकलुन दिल्याबाबत तक्रार सागरवाडी येथील तरुण
कार्यकर्ता प्रताप कोंडीराम कवाळे यांनी भाजपाच्या जिल्हाध्यक्षांकडे
लेखी स्वरुपात केली आहे.
प्रताप कवाळे हे सागरवाडी येथील रहिवाशी असून त्यांचे शिक्षण बी.ए.
पदवीधरपर्यंत झालेले आहे. प्रताप हा सुशिक्षीत बेरोजगार आहे. त्याच्या
उदरनिर्वाहासाठी शेती व्यवसाय करीत आहे. भारतीय जनता पक्षाचा एकनिष्ठ
कार्यकर्ता असून तो व माझा राजपूत समाज गेल्या अनेक वर्षापासून भारतीय
जनता पक्षाचा विकास व विस्तार होण्यासाठी प्रयत्न करीत असून माझा संपूर्ण
राजपूत समाज हा भारतीय जनता पक्षाला मतदान करीत आहे.
तसेच मी पंचायत समिती बदनापूर येथे विहिर अनुदान मिळणेसाठी प्रस्ताव सादर
केला असून सदर प्रस्ताव गट विकास अधिकारी, पंचायत समिती बदनापूर हे मंजुर
करीत नसल्यामुळे मी आमदार नारायण कुचे यांच्याकडे जाऊन माझा प्रस्ताव
मंजुर करण्यासाठी शिफारस करावी अशी विनंती केली असता आमदार नारायण कुचे
यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये अपमानास्पद वागणुन देऊन, तु दारू पिऊन आला
का, तु अंघोळ केली का, तुझ्या अंगाचा वास येतो, असे म्हणुन मला अपमानित
केले व त्यांच्या ऑफिसमधुन मला हाकलून दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here