Home Breaking News @@अज्ञात कारणाने आग @@

@@अज्ञात कारणाने आग @@

94
0

@@अज्ञात कारणाने आग @@
(युवराज देवरे प्रतिनिधी दहीवड)
दहिवड ता देवळा जि नाशिक ते खारीपाडा फुलेनगर रस्त्यावरील गट नंबर १२५८ येथे शेतात अज्ञात कारणाने आग लागली असुन त्वरीत प्रशासनाने दखल घेऊन पंचनामा करावा हि विनंती.

सविस्तर असे कि दहिवड खारीपाडा फुलेनगर मार्गावरील रस्त्याशेजारील श्री शिवाजी महादू सोनवणे व इतर दोन जणांचे नावे असलेल्या क्षेत्रात गव्हाची कापणी झालेली होती. त्याच क्षेत्रात मका चारा अंदाजे ५ ट्राली जनावरांसाठी उडवे रचून ठेवलेला होता. अज्ञात व्यक्तीने अथवा अज्ञात कारणाने सदर क्षेत्रात आग लागली असुन शेजारील कांदा पिकाला ही आगीची झळ बसलेली आहे.
सदर शेतकरी यांचे घरी कोणीही नव्हते आग विझविणे कामी गंगा खैरनार मनोज देसले नाना रामभाऊ संजय रौंदळ आदिंनी परीश्रम घेऊन आगआटोक्यात आणली.
सदर नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या क्षेत्राची पाहणी जि प सदस्य यशवंत शिरसाठ प्रहार शेतकरी संघटना देवळा तालुका अध्यक्ष संजय दहिवडकर व इतर मान्यवर नागरिकांनी केली असून प्रशासनाने दखल घेऊन नुकसान ग्रस्त शेतकऱ्याला भरपाई द्यावी हि विनंती.

Previous article🛑 गुहागरच्या सुपुत्राला नवचैतन्य महाराष्ट्र कवीरत्न पुरस्कार प्राप्त 🛑
Next articleमुखेड तालुक्यातील मौजे डोरनाळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here