Home मुंबई “टोपे साहेब यांनी पुन्हा आरोग्य विभागाची भरती देणाऱ्या लाखो उमेदवारांचा ब्लड प्रेशर...

“टोपे साहेब यांनी पुन्हा आरोग्य विभागाची भरती देणाऱ्या लाखो उमेदवारांचा ब्लड प्रेशर वाडवला,फॉर्म भरताना नागपूर, मात्र परीक्षेला सकाळी ठाणे आणि दुपारी वाशिम केंद्र दिलं… साहेब हेलिकॉप्टरची सुविधा करतील हीच युवा मराठा न्युज चॅनेलकडून अपेक्षा”

204
0

राजेंद्र पाटील राऊत

“टोपे साहेब यांनी पुन्हा आरोग्य विभागाची भरती देणाऱ्या लाखो उमेदवारांचा ब्लड प्रेशर वाडवला,फॉर्म भरताना नागपूर, मात्र परीक्षेला सकाळी ठाणे आणि दुपारी वाशिम केंद्र दिलं…
साहेब हेलिकॉप्टरची सुविधा करतील हीच युवा मराठा न्युज चॅनेलकडून अपेक्षा”

ठाणे (अंकुश पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्यूज चॅनल)

राज्याच्या आरोग्य विभागाच्या भरतीचा प्रश्न अद्यापही मिटलेला नाही. एकदा ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्यानं राज्यातील हजारो परीक्षार्थींनी आक्रोश केला. मात्र, आता दुसऱ्यांदा परीक्षा घेताना देखील या तरुणांना मनस्तापच सहन करायला लागत असल्याचं दिसत आहे. अनेक परीक्षार्थींना अर्ज करताना जे केंद्र मागितलं ते मिळालंच नाही. उलट एकाच दिवशी होणाऱ्या दोन पेपरसाठी सकाळी एका वेगळ्या जिल्ह्यात आणि दुपारी आणखी वेगळ्या जिल्ह्यात केंद्र दिल्याचं समोर येतंय. यामुळे या परीक्षार्थींनी ही परीक्षा कशी द्यायची असा प्रश्न उपस्थित राहिलाय.

शासनास माझी हीच नम्र विनंती आहे की यावेळी सुद्धा परीक्षा फार्म भरताना नागपूर परीक्षा केंद्र निवडलं होतं, तिथेच परीक्षा केंद्र उपलब्ध करून द्यावं.” तसेच परीक्षेपासून वंचित राहिल्यास याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल, असा इशाराही दिलाय.

आरोग्य विभागाच्या भरतीत पुन्हा एकदा नियोजनाचा अभाव?
नितेश दडमल याने ट्विटरवर आपला प्रश्न मांडत थेट राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सवाल केलाय. त्याचं हे ट्वीट मोठ्या प्रमाणात शेअर होतंय. तसेच अनेक इतर परीक्षार्थी या ट्वीटवर आपली मतं मांडत आहेत. तो म्हणाला, “आरोग्य विभागाच्या भरतीत पुन्हा एकदा नियोजनाचा अभाव जाणवल्याबद्दल टोपे साहेब अभिनंदन. अर्ज भरताना तर मी नागपूर परीक्षा केंद्र निवडलं होतं. असं असतांना आता परीक्षेला सकाळच्या सत्रात ठाणे आणि दुपारच्या सत्रात वाशिम परीक्षा केंद्र दिलंय. आरोग्य भरती करणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो.”

“आधी आरोग्य विभागाकडून २ सत्रात परीक्षा देण्याची मुभा, आता केंद्र वाटपात गोंधळ”
विशेष म्हणजे आरोग्य विभागातील विविध जागांसाठी अर्ज मागवताना उमेदवार २ वेगळ्या सत्रातील परीक्षेला बसू शकतात अशी मुभा देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात केंद्र वाटप करताना परीक्षार्थींना या परीक्षेला उपस्थितच राहता येणार नाही अशा प्रकारे केंद्र वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. काही उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार मागील वेळी रद्द झालेल्या परीक्षेवेळी केंद्र एकाच जिल्ह्यात मिळालं होतं.

“टोपे साहेब मुलांच्या आयुष्याचा खेळ करू नका”
“मी अर्ज करताना केंद्र नागपूर निवडले होते. असं असताना माझा पहिला पेपर लातूर आणि दुसरा पेपर अकोला येथे देण्यात आला. टोपे साहेब इतकेही मुलांच्या आयुष्याचा खेळ करू नका. कणखर महाराष्ट्राचं नाव घालवू नका,” अशी संतप्त प्रतिक्रिया परीक्षार्धी व्यक्त केलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here