Home मुंबई उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांसोबत जाऊन पक्ष बनवला,वडील बाळासाहेब ठाकरेंचं नाव बुडवलं आहे,...

उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांसोबत जाऊन पक्ष बनवला,वडील बाळासाहेब ठाकरेंचं नाव बुडवलं आहे, तर राज ठाकरे यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते कांचन गिरी यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका

128
0

राजेंद्र पाटील राऊत

उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांसोबत जाऊन पक्ष बनवला,वडील बाळासाहेब ठाकरेंचं नाव बुडवलं आहे, तर
राज ठाकरे यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते कांचन गिरी यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका

ठाणे (अंकुश पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनेल)

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव बुडवलं”, कांचन गिरींचा हल्लाबोल, राज ठाकरेंवर ‘ही’ प्रतिक्रिया
कांचन गिरी यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केलीय. उद्धव ठाकरे यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरेंचं नाव बुडवलं आहे, असं मत कांचन गिरी यांनी व्यक्त केलं.

कांचन गिरी यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केलीय. उद्धव ठाकरे यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरेंचं नाव बुडवलं आहे, असं मत कांचन गिरी यांनी व्यक्त केलं. मात्र, यावेळी त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं कौतुक केलं.

हिंदुराष्ट्राच्या बांधणीसाठी राज ठाकरेंची भेट घेत असल्याचं कांचन गिरी यांनी सांगितलंय. राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कांचन गिरी आणि सुर्याचार्य दोघे मुंबईत दाखल झालेत. यावेळी माध्यमांशी त्या बोलत होत्या.
कांचन गिरी म्हणाल्या, “उद्धव ठाकरे यांच्यावर मला काहीही बोलायचं नाही, कारण त्यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरे यांचं नाव बुडवलं आहे. बाळासाहेब ठाकरे जे बोलायचे ते करत होते. ते हिंदूवादी होते. बाळासाहेब वाघासारखे हिंदूंसाठी बोलायचे.”

उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांसोबत जाऊन पक्ष बनवला. त्यासाठी मी नाराज आहे. पालघरमध्ये जे हत्याकांड झालं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपले डोळे आणि कान दोन्ही बंद केले होते,” असा आरोप कांचन गिरी यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

कांचन गिरी यांनी राज ठाकरेंचं कौतुक केलं. “राज ठाकरे यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते. बाळासाहेब ठाकरेंचा संकल्प राज ठाकरे पूर्ण करतील. राज ठाकरे यांच्या मनात उत्तर भारतीयांबाबत जो पूर्वग्रह झालाय तो मी दूर करेल. ते समजुतदार आहेत त्यामुळे ते हे समजून घेतील,” असंही कांचन गिरी यांनी नमूद केलं.

Previous articleमुखेडच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टरांची तात्काळ नेमणुक करा – शंकर अण्णा वडेवार
Next article“टोपे साहेब यांनी पुन्हा आरोग्य विभागाची भरती देणाऱ्या लाखो उमेदवारांचा ब्लड प्रेशर वाडवला,फॉर्म भरताना नागपूर, मात्र परीक्षेला सकाळी ठाणे आणि दुपारी वाशिम केंद्र दिलं… साहेब हेलिकॉप्टरची सुविधा करतील हीच युवा मराठा न्युज चॅनेलकडून अपेक्षा”
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here