Home गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांची अडवणूक खपवून घेतली जाणार नाही!! राज्य सरकारने तत्काळ...

गडचिरोली जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांची अडवणूक खपवून घेतली जाणार नाही!! राज्य सरकारने तत्काळ दखल न घेतल्यास जिल्ह्यत घरकुल धारकांचा विराट आंदोलन!!- !आमदार डॉ देवराव होळी!

38
0

राजेंद्र पाटील राऊत

गडचिरोली जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांची अडवणूक खपवून घेतली जाणार नाही!!
राज्य सरकारने तत्काळ दखल न घेतल्यास जिल्ह्यत घरकुल धारकांचा विराट आंदोलन!!- !आमदार डॉ देवराव होळी!
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
गडचिरोली विधानसभा मतदार
संघाचे आमदार डॉ देवराव होळी
गेल्या अनेक दिवसांपासून गोरगरीब घरकुल लाभार्थी
बांधवांच्या समस्या अविरत सोडवत आहेत घरकुल समस्या प्रकरणात सबंधित तालुक्याच्या संवर्ग विकास अधिकारी यांना वारंवार विचारणा करावी लागत आहे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आधीच घरकुल बांधकामासाठी एकीकडे रेतीची समस्या तर दुसरीकडे लोहा व सिमेंट यांचावाढलेला प्रचंड भाव तर कसेबसेजिल्ह्यातील गरिबांनी घरकुलचे काम तर सुरू केले परंतु केलेल्या कामाचे पैसे सबंधित पंचायत समितीचे वतीने मिळण्यास विलंब
होत असल्याने प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे ,आज सायंकाळी आमदार डॉ देवराव होळी यांनी कोणसरी गावात नागरिकांशी संवाद साधत गावात फेरफटका मारताना मधेच एका व्यक्तीने घरकुल बाबत तक्रार केली व आमदार डॉ होळी यांनी प्रत्यक्ष येथील घरकुलांचे पाहणी केले , कोणसरी गावात चाळीस घरकुल मंजूर करण्यात आले काम सुरू करण्याचा आदेश मिळाला परंतु अनेक गोरगरीब लाभार्थी यांना अजूनपर्यंत पहिला
हप्ता सुद्धा मिळाला नाही , जिल्ह्यातील गोरगरीब जनता बचत गटाच्या व सावकारांच्या माध्यमातून व्याजने कर्ज घेऊन आपल्या घरकुलाचे काम कसेबसे सुरू केले आहे ,परंतु राज्य सरकारच्या
दीन मे ढाई कोस , दिरंगाई पणामुळे सर्वसामान्य गोरगरीब
जनतेत खूप मोठा आक्रोश आहे असे निदर्शनास येत आहे
व राज्य सरकारने जिल्ह्यातील
तमाम घरकुल धारकांना तत्काळ
निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी आमदार डॉ देवराव होळी यांनी केले व सांगितले राज्य सरकार गोरगरीब जनतेला घरकुलाचे निधी लवकरात लवकर उपलब्ध करुन न दिल्यास गडचिरोली जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने लवकरच विराट आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा दिला ,
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख , ज्येष्ठ नेते जयराम चलाख , युवा नेते प्रतीक राठी , भाजप नेते मास्टर बंडू
बारसागडे , बोनगिरवार सावकार
व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here