Home नांदेड मुखेडच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टरांची तात्काळ नेमणुक करा – शंकर...

मुखेडच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टरांची तात्काळ नेमणुक करा – शंकर अण्णा वडेवार

87
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेडच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टरांची तात्काळ नेमणुक करा – शंकर अण्णा वडेवार

नांदेड ,( मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)     “नांदेड जिल्ह्यातील बातम्या मुलाखती जाहिरातीसाठी व नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात प्रतिनिधीपदासाठी संपर्क मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

मुखेड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा जिल्हा अध्यक्ष शंकर अण्णा वडेवार यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली आहे.

मुखेड तालुक्यातील नागरिकांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाने करोडो रूपये खर्च करून उभारलेल्या भव्यदिव्य इमारत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता नसल्याने तालुक्यातील नागरिकांना नांदेड, उदगीर , हैद्राबाद, औरंगाबाद येथे जावे लागते आहे..

अश्याच प्रकारे अपंग दिव्यांग व्यक्तींचा योग्य प्रकारे इलाज करण्यासाठी मुखेड उपजिल्हा रुग्णालयात अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता नसल्याने शहरातील व तालुक्यातील अपंग दिव्यांग बांधवांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

तालुक्यातील नागरिकांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मुखेड उपजिल्हा रुग्णालयात अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा जिल्हा अध्यक्ष शंकर अण्णा वडेवार यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर , प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा जिल्हा अध्यक्ष शंकर अण्णा वडेवार , तालुका अध्यक्ष शिवानंद बंडे , शहराध्यक्ष साईनाथ बोईनवाड , अनिल घायाळे , अस्लम सय्यद, बळिराम गेडेवाड , बबलू एस के, यांची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here