Home कोल्हापूर आगामी नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवा =मुरलीधर जाधव .

आगामी नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवा =मुरलीधर जाधव .

467
0

राजेंद्र पाटील राऊत

आगामी नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवा =मुरलीधर जाधव .

पेठवडगाव राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क :शिवसेनेच्यावतीने पेठवडगावमध्ये हातकणंगले तालुका शिवसेना पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रस्तावित आण्णासो बीलोरे यांनी केले तर स्वागत वडगाव शिवसेना शहरप्रमुख संदीप पाटील यांनी केले.संदीप पाटील यांनी आपल्या भाषणात वडगाव नगरपालिका निवडणुकांमध्ये स्थानिक आघाडीबरोबर जास्तीत जास्त प्रमाणात जागा देतील अशा आघाडी बरोबर जाण्याचा निर्धार केला .व शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहनही केले.जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी बोलताना सांगितले की जे पदाधिकारी पक्षाचे काम करीत नाहीत त्यांना पदमुक्त करण्यात येईल.अंतर्गत वाद बाजूला ठेवून येणारे वडगाव नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवून दाखवू असे मनोगत जिल्हाप्रमुख यांनी व्यक्त केले.
या वेळी प्रवीण देसाई यांनी सांगितले की जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे आपापल्या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला पाहिजे ही जबाबदारी तेथील पदाधिकार्यांची आहे.या वेळी उपस्थित बबलू खाटीक सागर साखळकर यासीर मोमीन अंकुश माने सुनिल माने सागर गायकवाड आधी शिवसैनिक उपस्थित होते

Previous articleगोरखच्या प्रेमाला “कल्याणीचे”ग्रहण, जीवंत जाळण्याच्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हेगारांचे केले नामोहरण !! लोहणेर येथील आज दुपारची घटना..
Next articleसपोनि.महादेव पुरी यांनी तपासाचे चक्रे फिरविले तीन आरोपीना २४ तासाच्या आत पकडण्यात यश १ ट्रॅक्टरसह ३ आरोपी कुंटूर पोलिसांच्या ताब्यात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here