Home गुन्हेगारी गोरखच्या प्रेमाला “कल्याणीचे”ग्रहण, जीवंत जाळण्याच्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हेगारांचे केले नामोहरण !! लोहणेर...

गोरखच्या प्रेमाला “कल्याणीचे”ग्रहण, जीवंत जाळण्याच्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हेगारांचे केले नामोहरण !! लोहणेर येथील आज दुपारची घटना..

1499
0

राजेंद्र पाटील राऊत

(भिला आहेर तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा- तालुक्यातील लोहोणेर येथे प्रेम प्रकरणाच्या वादातून लग्न मोडल्याच्या संशयावरुन रावळगाव ता.मालेगाव येथिल मुलीने आपल्या कुटूंबियांच्या मदतीने मुलाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली असून तालुक्यात खळबळ उडाली.
याप्रकरणी देवळा पोलिसांनी मुलीसह आई, वडिल, व दोन भाऊ असे पाच जणांना ताब्यात घेतले आहे.दरम्यान घटनेची माहीती मिळताच माधुरी कांगणे पोलिस उपअधिक्षक नाशिक ग्रामिण, आमोल गायकवाड उपविभागिय अधिकारी कळवण यांनी घटना स्थळी भेट दीली.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की लोहोणेर येथिल युवक गोरख बच्छाव (वय ३१) हा काही वर्षापूर्वी रावळगाव ता.मालेगाव येथील युवतीच्या संपर्कात आल्याने दोघांमध्ये प्रेम संबध निर्माण झाले. मात्र युवतीच्या घरच्यांनी तीचे दुसरीकडे लग्न निश्चित करण्याच्या निर्णयास संमती दिली मात्र सदर विवाह मोडल्याने तो गोरख यानेच मोडल्याचा संशय बळावला. म्हणून त्यास लोहोणेर येथे येवून डोक्यात लोखंडी सळईने वार करुन मुलीने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने गोरख बच्छाव हा सुमारे ५५ टक्के भाजला असून त्यावर देवळा ग्रामिणरुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढिल उपच्यारर्थ नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
सदर घटनेची माहीती मिळताच पोलिस निरिक्षक दिलिप लांडगे, निलेश सवकार, सचिन भामरे, सुनिल गांगुर्डे, सुरेश कोरडे आदिंनी तात्काळ घटस्थळी धाव घेत संशयीत आरोपी मुलगी कल्याणी गोकुळ सोनवणे (वय २३) वडिल गोकुळ सोनवणे वय ५७,आई निर्मला सोनवणे वय ५२, भाऊ हेमंत सोनवणे वय३०व प्रसाद सोनवणे वय १८, यांना ताब्यात घेतले असून वरिष्ठ पोलिस अधिकारी माधुरी कांगने व उपविभागिय अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक दिलिप लांडगे व सहकारी करीत आहे.

Previous articleविकासकामांच्या माहितीची गाडी आली…!
Next articleआगामी नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवा =मुरलीधर जाधव .
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here