Home नांदेड सपोनि.महादेव पुरी यांनी तपासाचे चक्रे फिरविले तीन आरोपीना २४ तासाच्या आत पकडण्यात...

सपोनि.महादेव पुरी यांनी तपासाचे चक्रे फिरविले तीन आरोपीना २४ तासाच्या आत पकडण्यात यश १ ट्रॅक्टरसह ३ आरोपी कुंटूर पोलिसांच्या ताब्यात

183
0

राजेंद्र पाटील राऊत

सपोनि.महादेव पुरी यांनी तपासाचे चक्रे फिरविले

तीन आरोपीना २४ तासाच्या आत पकडण्यात यश

१ ट्रॅक्टरसह ३ आरोपी कुंटूर पोलिसांच्या ताब्यात

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्यूज)

तालुक्यातील नांदेड – नायगाव महामार्गावर असलेल्या घुंगराळा जवळील रस्त्यावर ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर दिनांक ९ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या मध्यरात्री जात असताना ट्रॅक्टरच्या समोर कार आडवी लाऊन जबरीने ट्रॅक्टर पळविले असल्याची माहिती कुंटूर पोलीसाना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांनी तपासाची चक्र फिरवून चोवीस तासाच्या आत ट्रॅक्टर पळवलेल्या तीन चोरांना पकडण्यात यश मिळवले आहे.
सविस्तर वृत्त असे की दिनांक ९ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या रात्री ३ वाजताच्या सुमारास ऊसाने भरलेल्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर क्रमांक एम एच-२६ , बी क्यू -१९१४ या क्रमांकाचे ट्रॅक्टर कारखान्याकडे जात असताना नांदेड ते नायगाव महामार्गावरील असलेल्या घुंगराळा जवळ कार क्रमांक एम..एच-२४ , व्ही-९७०२ या क्रमांकाची कार ट्रॅक्टरच्या समोर आडवी लाऊन जाण्याचा मार्ग अडवून चालकाला मारहाण करून ऊसाने भरलेली ट्रॉली जाग्यावरच सोडून ९ लाख रुपये किंमतीचे ट्रॅक्टर (हेड) जबरीने चोरून नेले असल्याने कुंटूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांनी तपासाची सूत्रे हलवून जबरीने चोरून नेलेल्या ट्रॅक्टर सह तीन आरोपींना देगलूर पोलिसांच्या मदतीने चोवीस तासाच्या आत पकडण्याच यश पोलिसांना मिळाल आहे.
कुंटूर पोलीस ठाण्यात अंकुश प्रेमदास चव्हाण व्यवसाय ड्रायव्हर रा.गोविंद तांडा ता.लोह यांच्या फिर्यादीवरून सपोनि. महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली
अतुल लक्ष्मण गुंटे, पांडुरंग सुग्रीव शिंदे, हरिदास ब्रह्मदेव शिंदे सर्व रा. हागरुळ तालुका जिल्हा सोलापूर याच्या विरोधात कलम ३९२ ,३४१ , ३४ भादवी प्रमाणे
गुन्हा दाखल झाला असून अटक करण्यात आले आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय अटकोरे हे करीत आहेत.

Previous articleआगामी नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवा =मुरलीधर जाधव .
Next articleनायगाव तालुक्यातील मौजे हुस्सा व राहेर शिवारात चोराचा सुळसुळाट.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here