Home नांदेड नायगाव तालुक्यातील मौजे हुस्सा व राहेर शिवारात चोराचा सुळसुळाट.

नायगाव तालुक्यातील मौजे हुस्सा व राहेर शिवारात चोराचा सुळसुळाट.

192
0

राजेंद्र पाटील राऊत

नायगाव तालुक्यातील मौजे हुस्सा व राहेर शिवारात चोराचा सुळसुळाट.

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्युज)

हुस्सा येथील माजी उपसरपंच श्री शेषराव पाटील यांचा मुलगा श्री दत्ताराम शेषराव हंबर्डे यांना आज सायंकाळी 7 च्या दरम्यान राहेर व हुस्सा च्या मध्यभागी पुलाच्या ठिकाणी 3-4 अज्ञात /चोरांनी ते मुलगा गाडीवरून जात असताना त्याला पकडून गाडीवरून थेट बाजूच्या टाळक्यात उचलून नेऊन त्याला चाकू, खंजीर, पंचांची भीती देऊन आणि त्याला जबर मारहाण करून त्याच्या जवळील रोख रक्कम 2500- 3000 हजार, व मोबाईल, आणि गाडीची चावी काढून घेऊन फरार झाले. याच वेळी हुस्सा येथील गंगाधर गायकवाड यांचा ऑटो रस्त्यावरून कारेगाव फाटा येथे जात असता मुलानी त्या ऑटोस ओळखून गंगा गंगा म्हणत रब्बी पिकांच्या बाहेर आले असता त्या ऑटो वाल्यानी त्या मुलास ओळखून ऑटो उभा करून त्याला ऑटो मध्ये घेऊन त्या चोराच्या भीतीपोठी थेट ऑटो राहेरच्या दिशेने नेऊन प्रार्थमिक ग उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले असून. मुलास मुका मार लागला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
मागील दोन दिवसापूर्वी हुस्सा येथील एका मुलीचे गाडीवरून जात असता त्या मुलीचे पर्स हिसकावून सदर मुलीच्या पायातील चैन काढून घेऊन मारहाण केली. अशा घटना आठवडाभरापासून वारंवार घडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले
असून चोरांनी वेगवेगळे वस्त्र परिधान करून वेगळेवेगळे बहाणे करून लोकांचे जीव धोक्यात घालताहेत. यामुळे पोलिस प्रशासनाने या बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन जनतेस सुरक्षा देऊन सहकार्य करावे. अशी मागणी परिसरातील नागरिकाकडून केली जात आहे. किंबहुना या भागात पोलीस फोर्स देण्यात यावा अशी मागणी या भागातील नागरिकातून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here