Home Breaking News *महान कर्मयोगी ,कर्मवीर भाऊराव पाटील* *

*महान कर्मयोगी ,कर्मवीर भाऊराव पाटील* *

274
0

*महान कर्मयोगी ,कर्मवीर भाऊराव पाटील* *आज रयत शिक्षण संस्थेचे आधारवड कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती.त्यानिमित हा विशेष लेख! व्यवस्थापकीय संपादक* कर्मवीर अण्णांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी 22 सप्टेंबर1887 रोजी झाला, माता गगाबाईचे पिता पायगौनडा पाटील यांचे भाउराव प्रथम अपत्य होय, भाऊरावांन तीन भाऊ व दोन बहिणी होत्या, त्यांचे लहानपणी ठेवलेले नाव भाऊ हे त्यांनी जीवनभर संभाळले, व ते उभ्या महाराष्ट्रातील सामान्य ,गरीब ,जनतेचे भाऊ झाले, भाऊराव प्रथम अपत्य असल्याने तसे ते आई वडिलांचे लाडके होते,मात्र,आई शिस्तप्रिय असल्याने भाऊं ना त्यांचा हूडपणा,खोडकरपणा या बद्दल आईचा प्रसाद ही घ्यावा लागे, वडील मात्र अत्यनंत कर्मठ वृत्तीचे होते,ते तहसील कार्यालयात काम करत असत,आपल्या मुलांनी खूप शिकावे,मोठाल्या पदव्या मिळवाव्यात, व सन्मानाची नोकरी करावी,असे त्याना वाटत असे,पण वारंवार होणाऱ्या बदल्यामुळे ते आपलया मुलांकडे फारसे लक्ष देऊ शकले नाहित, वेक्तीच्या भावी जिवनाची जडण घडन बालवयातील अनेक प्रसंगातून घडत असते,तसेच भाऊरावांचेही झालेले आहे, त्यांच्या बालपणी सरकार आणि समाज कंटक ज्याला शत्रु म्हणून ओळखत पण गोरगरीब जनतेचा जो मित्र आधार होता, अश्या सत्तापा भोसले यांच्याशी भाऊरावांचा घनिस्ट संबंध आला,तो भाऊरावांचा मामाच होता,परिसरातील अन्याय, अत्याचार व पिळवणूक या विरुध्द साततत्याने त्या वेळी बंड पुकारले होते,तो गरिबांचे रक्षण करणार हे समाज कंटकांचा कर्दनकाळ होता,अश्या बंड खोरीने भाऊरावांच्या जीवनात अढळपद मिळविले,नेत्यांना आयुष्यभर आपल्या कार्यासाठी वापरत आले, पूर्वजनाचे साधुत्व व सत्यपाची बंडखोरी यांचे मिलन म्हणजे भाऊरावांचे जीवन आहे, भाऊरावांचा बालपणी चा काळ मजेत गेला,पण त्यांच्या बालजीवणातील अनेक घटना त्यांच्या भावी कार्याची ओळख करून देतात,एकदा विटा या गावी असताना एका अस्पृश्य मित्राबसरोबर एका विहिरीत पाणी पिण्यास गेले असता त्या ठिकाणी अस्पृश्य मित्रास पाणी पिण्यास प्रतिबंध केला व अपमानित ही केले,भाऊरावांना सांगण्यात आले की ,तुला पाणी पिता येईल,मात्र मित्राला नाही, तेंव्हा त्यांनी मित्रालही पाणी मिळाले पाहिजे ,असे सांगितले, शेवटी हुज्जत झाली,भाऊराव तेथील लोकांना म्हणाले ,आम्हा दोघानाही पाणी पिऊ देणार नसाल तर तुम्हाला ही पिऊ देणार नाही, असे ठणकावून सांगितले व त्यांनी विहिरीचा राहटच मोडून फेकून दिला,भाऊराव असे बंडखोर होते,त्याना जातीभेद मान्य नव्हता, स्पृश्य – अस्पृश्य भेद ते मानत नव्हते,त्यासाठी त्यांनी आपले वस्तीग्रह मागास वर्गीय विद्यार्थ्या नरिता खुले केले, असाच प्रसंग कऱ्हाडला असताना घडला,तेथे पाण्याचे वेगवेगळ्या जमातीचे हौद होते,भाऊराव व त्यांची आत्या हौदावरून पाणी आणत असताना ब्राम्हण लोकांनी त्यांना विरोध केला,तेव्हा भाऊरावाणी दुसऱ्या जातीच्या मुलांना एकत्र करून सर्वच हौद वाटून टाकले,म्हणजे अगदी लहान वयातच त्यांनी जातियवादी विरोधी बंड पुकारले, भाऊरावांचे शिक्षण कोल्हापूरच्या जैन वसतिगृहात झाले, वस्तीग्राह्यत अनेक कर्मठ प्रथा होत्या,जेवण करताना सोहळे नेसने किंवा दुपारच्या जेवणानंतर दाढी न करणे त्या वेळी भाऊरावाणी कधीही न धुतलेल्या सोहळ्यापेक्षया स्वच्छ धुतलेले पांढरे शुभ्र धोतर नेसणे पसंत केले,तसेच जेवणानंतर किंवा दाढी केंवाही केली तर कोणता अधर्म होतो,

असा सवाल विचारला व दाढी केली.त्यामुळं झालेला दंड भरण्यास त्यांनी नकार दिला,ह्या दाढी प्रकारणामुळे त्यांना वसतिगृह सोडावे लागले व शिक्षणासाठी विराम द्यावा लागला.कदाचित ह्याचाच परिणाम म्हणून त्यांनी ह्यापुढे कधीच दाढी केली नसावी.त्यामुळे अभ्यासात त्यांची फारशी प्रगती झाली नाही. ते जेमतेम इंग्लिश सहावी पर्यंत गेले,पण सहावीत ते नापास झाले.त्यावेळी भाऊ रायांनी खुद्द राजश्री शाहू महाराजांना वशिला लावला.पण त्यांच्या शिक्षकाने स्पष्ट सांगितले की, भाऊ ज्या बाकावर बसतो तो बाक पुढच्या वर्गात नेने परवडेल, पण भाऊ नाही. त्यावेळी भाऊ रायांचे शिक्षण संपले.त्यांचे बालपण संपले.पण त्या गोष्टीचा असा परिणाम झाला असावा,की मला शिकता आले नाही, पण मी साऱ्या महाराष्ट्राला शिकविल.हा ध्यास त्यावेळी त्यांच्या मनात रुजला गेला असावा.
पुढे त्यांनी दगडी धोंड्याच्या ओबडधोबड राकड महाराष्ट्राला शिक्षण संजीवणीने नवीन रूप प्राप्त करून दिले, म्हणूनच आपणाला असे दिले की,कर्मवीरांच्या कार्याचा सूक्ष्म छटा त्यांच्या बालपणातच होत्या. त्याच पुढे दैदिप्यमान होऊन त्यांनी संपुर्ण महाराष्ट्र उजळून काढला. हा छोटासा गंगूबाईचा भाऊ पुढे संपुर्ण महाराष्ट्राचा भाऊ व भारताचा मार्गदर्शक, मानवतेचा आधार होऊन अनेक मान सन्मान होऊन गोरगरिबांचे कल्याण करण्यातच आपले संपुर्ण आयुष्य खर्ची घातले .

श्री. ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे
( एम. ए. बी.एड)
शारदा विद्या मंदिर, राहता

Previous article*वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतिने अपंगांना अनुदान मिळावे यासाठी मोर्चा व निदर्शने*
Next article🛑 श्री.शिवछत्रपतींच्या नित्य पूजेतील बाण 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here