• Home
  • *वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतिने अपंगांना अनुदान मिळावे यासाठी मोर्चा व निदर्शने*

*वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतिने अपंगांना अनुदान मिळावे यासाठी मोर्चा व निदर्शने*

*वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतिने अपंगांना अनुदान मिळावे यासाठी मोर्चा व निदर्शने*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

वंचित बहुजन युवक आघाडी च्या वतीने आज हातकणंगले तालुक्यातील कबनूर ग्रामपंचायत वरती अपंग बांधवांना सोबत घेऊन निदर्शने व धडक मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चे प्रसंगी कबनूर शहरातील अनेक दिव्यांग नागरिक उपस्थित होते उपस्थित होते.
याप्रसंगी मोर्चाचे नेतृत्व प्राध्यापक शरद कांबळे जिल्हायुवा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी केले. त्यांच्यासोबत अपंग सेवा संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित होते. सदर मोर्चा हा कबनूर येथील रत्नाप्पाण्णा कुंभार चौकातून ग्रामपंचायत कार्यालय वर्ती नेण्यात आला. अपंगांच्या विविध प्रश्नांवर ती हा मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये अपंगांना मिळणारे पाच टक्के अनुदान वाटप गेल्या अनेक वर्षापासून झाले नाही ते मिळावे, अपंगांच्या साहित्याचे वितरण लवकरात लवकर करण्यात यावे, साहित्य येऊन देखील ग्रामपंचायत या साहित्याचं वाटप करत नाही, 14 व्या वित्त आयोगाची अंतर्गत अपंगांच्या करिता विशेष कार्यक्रम आखण्यात यावेत, ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांचा अपंगांना नोकरीचा अनुशेष भरण्यात यावा. घरकुल योजनेअंतर्गत व आवास योजनेअंतर्गत अपंगांना प्राधान्य देण्यात यावे, लोक डॉन कालावधीमध्ये अपंगांच्या करिता आलेले सहानुग्रण अनुदान लवकरात लवकर देण्यात यावे, कबनूर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या ठिकाणी अपंगांना व्यवसाय करण्याकरता जागा उपलब्ध करून द्यावी ,या आणि अशा अनेक मागणीसह सदर मोर्चा हा ग्रामपंचायती वरती येऊन धडकला.
याप्रसंगी कबनूर येथील वंचित बहुजन आघाडीचे दिव्यांग कार्यकर्ते माननीय सचिन कांबळे यांनी अपंगांचे साहित्य लवकरात लवकर वाटप करावे असे मत व्यक्त केले , सदर मोर्चाचे निवेदन हे ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक बी.टी. कुंभार यांच्याकडे देण्यात आले, याप्रसंगी बी.टी. कुंभार यांनी मागण्यांचा सकारात्मक विचार करून, ग्रामपंचायत प्रशासक, ग्राम विस्तार अधिकारी, आणि वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी यांची प्रशासकीय पातळीवर ती मिटिंग लावण्याचे आश्वासन दिले. व उपलब्ध असलेले सर्व साहित्य लवकरात लवकर वाटप करतो असे मत व्यक्त केले.
हा मोर्चा यशस्वी व्हावा म्हणून माननीय नानासाहेब पारडे (भा. री. प. बहुजन महासंघ माजी जिल्हा अध्यक्ष), मा. राणी ताई सोनवणे (जिल्हा महिला सचिव), मा राहुल राजहंस (युवा जिल्हा कार्याध्यक्ष) मा. मिलिंद सनदी (युवा जिल्हा महासचिव) माननीय सचिन कांबळे कबनूर , कबनूर शहर वंचित बहुजन आघाडी चे ज्येष्ठ नेते मा. विश्वास फरांडे, मा. दिलीप शिंगे सर, मा अशोक अमृत कांबळे सर, मा रावसाहेब निर्मळे (जिल्हा संघटक), पेठ वडगांव शहराध्यक्ष मा. अश्वजीत पोवार, महासचिव मा. आकाश पोवार, उपाध्यक्ष मा गणेश मोरे, मा. अतिश धनवडे, अनिकेत कांबळे, अपंग संघटनेचे उपाध्यक्ष अनिल पाटील सदस्य सुधीर लोले व इत्यादीउपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment