Home अमरावती दर्यापूर येथील आमदार वानखडे यांच्या कार अपघात प्रकरणी चालकाला अटक: अपघातात भावाचा...

दर्यापूर येथील आमदार वानखडे यांच्या कार अपघात प्रकरणी चालकाला अटक: अपघातात भावाचा मृत्यू झाला तर समजतात त्याच्या दुसऱ्या भावाचा हृदयविकाराने मृत्यू.

95
0

आशाताई बच्छाव

IMG_20231225_065410.jpg

दर्यापूर येथील आमदार वानखडे यांच्या कार अपघात प्रकरणी चालकाला अटक: अपघातात भावाचा मृत्यू झाला तर समजतात त्याच्या दुसऱ्या भावाचा हृदयविकाराने मृत्यू.
————
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांच्या भरधाव कारणे शुक्रवारी सायंकाळी दर्यापूर अमरावती मार्गावर लाखापुर फाट्याजवळ उभ्या ट्रॅक्टर ट्रॅव्हलला धडक दिली त्यात मोहम्मद खलिद मोहम्मद अजमत वय ६3 याचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान अपघातात मोठ्या भावाचा मृत्यू झाल्याची लहान भाऊ जावेद मोहम्मद अजमदवय५९ यांना मिळाली भावाच्या अपघाती मृत्यूचे वृत्त कळताच दोन तासाच्या फरकाने हृदयविकाराचा त्रिवे धक्क्याने जावेद याचाही मृत्यू झाला. दुपारी दोन्ही भावावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आमदार वानखडे यांच्याकार चालकाला पोलिसांनी अटक केले. दर्यापूर तालुक्यातील लखापुर फाट्याजवळ शेतात कापूस व्यक्ती झाल्यानंतर मुख्य रस्त्या लागत उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीत मजूर कापसाचे गाठोडे ठेवत होते त्याच वेळी भरदाव आलेला भरधाव कारणे एमएच २७/सीक्यु२१२९ ट्रॅक्टर ट्रॉली ला जोरदार धडक दिली. या अपघातात शेतमालक तथा सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष मोहम्मद खलील याचा जागीच मृत्यू झाला व इतर सहा मजूर जखमी झालेत. अपघाताच्या वेळी अपघाताच्या वेळी त्या कारमध्ये आमदार वानखडे माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांच्या वाहनात होते. तर आमदार वानखडीच्या कारमध्ये चालक व त्यांचे स्विय सहाय्यक होते. घटनेनंतर दर्यापूर पोलिसांनी तात्पुरतेने घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर पंचनामा करून अपघाताला कारणीभूत ठरलेला आमदाराची कार रात्री ताब्यात घेण्यात आली. अपघात प्रकरणी गुन्हा नोंदवून चालकास अटक करण्यात आली. चालक अंकुश नागोराव डोंगरदिवे वय २६रा. लेहगावरेल्वे ता. दर्यापूर यांच्यावर विविध कलम नावे गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली. घटनेचा पुढील तपास दर्यापूर पोलीस करीत असल्याची माहिती ठाणेदार संतोष ताले यांनी दिली आहे. दरम्यान या घटनेला कारणीभूत असलेली कार ताब्यात घेण्यात आली.

Previous articleकटकवार विद्यालयात टाकावू पासून टिकावू उपक्रम
Next articleराष्टसंतांनी आपल्या ग्रामगीतेतून विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. -आ.सौ. सुलभाताई खोडके
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here