Home परभणी #दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप#

#दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप#

56
0

राजेंद्र पाटील राऊत

#दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप#
जिंतूर,(शत्रुघ्न काकडे पाटील ब्युरो चीफ  युवा मराठा न्युज)-येथील सिद्धेश्वर विद्यालयात दि 08।03।2022वार मंगळवार रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री उपेंद्र दुधगावकर हे होते तर प्रमुख पाहुणे नंदकुमार खोडके होते,हा कार्यक्रम वर्ग 9वा चे वर्ग शिक्षक श्री अरुण लोलगे यांनी घडवून आणला. प्रथम महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमास सुरुवात झाली.इयत्ता10वीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बहुतेक विद्यार्थी भावनिक झाले होते. प्रमुख पाहुणे श्री नंदकुमार खोडके,लिपणे महेंद्र, विक्रम कदम,नमिता सोळंके यानीविद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शेवटी मुख्याध्यापक श्री उपेंद्र दुधगावकर यांनी अध्यक्षीय समारोप केला.नंतर वर्ग 9वा व वर्ग10 वा च्या विद्यार्थ्यांसमवेत सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यान8 जेवणाचा आस्वाद घेतला.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनुप सोळंके,कैलास पवार,दहीभाते ज्ञानोबा,उफाडे कचरू,हातागळे माऊली,शिंदे राजू यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास गुळवे सुनीता,खंदारे सर,वडकूते सर,मुटकुळे सर,लोलगे सर,जगताप सर,नागरे सर,पठाण सर,ईखे मॅडम,चिरंगे सर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here