Home महाराष्ट्र शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचा महिला सरपंच परिषदेत ‘शिवीगाळ’,महिला ग्रामसेवकांचा अपमान…!

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचा महिला सरपंच परिषदेत ‘शिवीगाळ’,महिला ग्रामसेवकांचा अपमान…!

220
0

राजेंद्र पाटील राऊत

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचा महिला सरपंच परिषदेत ‘शिवीगाळ’,महिला ग्रामसेवकांचा अपमान…!

पालघर /ठाणे वैभव पाटील

औरंगाबाद येथे दि.८/११/२०२१ रोजी महिला सरपंच परिषदेचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांची मार्गदर्शन करताना जीभ घसरली,स्वतःच्या अकलेचे तारे तोडून सरपंच अधिकारी वर्गात आमदार म्हणून आपण किती लायक आहोत हे दाखवून दिले आहे.
शिरसाट म्हणाले, ‘एक लक्षात ठेवा, सगळ्यात जर भामटा माणूस असेल तर तो ग्रामसेवक आहे. तो तुम्हाला कधी मूर्ख बनवेल हे सांगता येत नाही.तो तुमचे ऐकतो असे दाखवेल पण बाहेर गेल्यास सरपंचांच्या सांगण्यावरून केले असे सांगत स्वतःच्या अंगावर काही येऊ देत नाही’ या वक्तव्याने आता नवा वाद सुरु झाला आहे. याचे पडसाद आज उमटले असून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनीयनने आ. शिरसाट यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. आज त्यांनी एक दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले आहे.

येथे महिला सरपंच कार्यक्रम चालू असताना आमदार संजय शिरसाट यांनी ” ग्रामसेवक हे भामटे असतात, हरामखोर ” असे अपशब्द वापरले आहेत. या प्रकारामुळे अपमानीत,नाराज झालेल्या सर्व ग्रामसेवक कामगारांनी दि.९/११/२०२१ रोजी काळया फिती लावून काम बंद आंदोलन केले आहे.

तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा पालघर यांनी शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्यावर शासकीय व्यासपीठावरून सरपंच व ग्रामसेवक यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न,तसेच चितावनीखोर भाषण केल्या बदल आमदार शिरसाट यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १०७,१५३ अ ,२२८,२९४,५००,५०४,५०६ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. पालघर जिल्ह्यातही वाडा, पालघर, वसई विक्रमगड या तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन च्या वतीने तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले.
तरी युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर च्या वतीने सुध्दा औरंगाबाद आमदार संजय शिरसाट यांचा महिलांना अपमानीत करणाऱ्या वक्तव्याचा निषेध करतो, ठाकरे सरकारने ही असा आमदारकी मिळाल्यामुळे डोक्यात हवा गेलेल्या अशिक्षित लोकांना आमदारकी सर्व काही नसते तर समाजामुळे आपण आमदार आहोत याची जाणीव करून द्यावी, या आधी सुद्धा युवा मराठा वेब न्युज चॅनल ने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजू नवघरे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली होती तेव्हा युवा मराठा पत्रकार महासंघ कडून जोरदार विरोध केला होता,ह्या आमदार साहेबांचां देखील आम्ही जोरदार विरोध,निषेध करतो…

तात्काळ यांच्यावर कारवाई झाली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात हे नवे आंदोलन उभे राहिले याची सर्वस्वी जवाबदारी राज्य सरकारची असेल याची नोंद घ्यावी.

Previous articleआमदार निकम यांच्या माध्यमातून जनसुविधा योजने अंतर्गत मंजूर आंबतखोल वाडीची रस्ता डांबरीकरण भुमिपूजन
Next articleगुहागर आगार येथे छावा प्रतिष्ठान (रत्नागिरी) आणि सर्व एस.टी.कर्मचारी वृंद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here