Home गडचिरोली भाजपा महिला आघाडी गडचिरोलीच्या वतीने मा.पंतप्रधान मोदीजींचे अभिनंदन करून धन्यवाद दिले.

भाजपा महिला आघाडी गडचिरोलीच्या वतीने मा.पंतप्रधान मोदीजींचे अभिनंदन करून धन्यवाद दिले.

49
0

आशाताई बच्छाव

IMG-20230925-WA0067.jpg

भाजपा महिला आघाडी गडचिरोलीच्या वतीने मा.पंतप्रधान मोदीजींचे अभिनंदन करून धन्यवाद दिले.

नारीशक्ती वंदन अधिनियम ला लोकसभेत मंजुरी मिळाली या निर्णयाचा मोदी सरकारला अभिनंदन करून धन्यवाद दिले .

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ):- 

नारीशक्ती वंदन अधिनियम ला संसदेत मंजुरी मिळाली असून भविष्यात होणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकी मध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार व या आरक्षणाची लवकरच अंमलबजावणी होणार आहे.या ऐतिहासिक निर्णयाचा भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोलीच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौक येथे प्रभारी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात फटाके फोडून व पेढे भरवुन मोदी सरकारला तसेच मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा अभिनंदन करून व धन्यवाद देऊन आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी जिल्हा सचिव प्रतिभाताई चौधरी,जिल्हा महामंत्री वर्षाताई शेडमाके,शहराध्यक्ष कविताताई उरकुडे,माजी नगरसेविका वैष्णवी नैतान,लताताई लाटकर, रश्मी बाणमारे,पुष्पाताई करकाडे,लक्ष्मीताई कलयंत्री,पल्लवी बारापात्रे,पूनम हेमके,नीताताई बैस,ज्योती बागडे,रंजनाताई शेंडे,रेखाताई उईके,अर्चनाताई निंबोड,महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Previous articleउघड्यावर साठविलेल्या धानाच्या विक्री रद्द करा : जयश्री वेळदा यांची मागणी
Next articleजिल्ह्याचा गौरव विकासात्मक कार्यात वाढविण्याकरीता उद्योजकांनी योगदान द्यावे- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here