Home Breaking News *आपला पोशिंदा संकटात आहे. तो जगला पाहिजे,* *खा.छत्रपती संभाजीराजे*

*आपला पोशिंदा संकटात आहे. तो जगला पाहिजे,* *खा.छत्रपती संभाजीराजे*

133
0

*आपला पोशिंदा संकटात आहे. तो जगला पाहिजे,*
*खा.छत्रपती संभाजीराजे*

*युवा मराठा न्यूज*

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आपला पोशिंदा अडचणीत आहे त्याला तातडीने मदत मिळायला पाहीजे असे भाजपाचे राज्यसभा खासदार पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
माध्यामांशी बोलताना खासदार संभाजी राजे म्हणाले, “मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी मी दौरा केला आहे. तेथील परिस्थिती भयानक झाली आहे. शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेतल्या असता, हेक्टरी ५० हजार रुपये सरकारनं दिली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
या मागणीची सरकारनं दखल घेतली पाहिजे. आपला पोशिंदा संकटात आहे. तो जगला पाहिजे. त्याला तात्काळ मदत झाली पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं राज्य मंत्रिमंडळात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्यानंतर केंद्राकडे निधी मागवा. अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथील महापूर आला होता. तेथील नुकसान भरपाईचा अहवाल केंद्राकडे गेला नाही. त्यामुळे केंद्राने त्यावेळी मदत जाहीर करून देखील केवळ राज्य सरकारनं अहवाल पाठवला नाही. त्यामुळे अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही. अशीच चूक यावेळी होता कामा नये, त्या दृष्टीनं राज्य सरकारनं पावलं उचलण्याची गरज आहे. तसेच करोनामुळे आपली तिजोरी रिकामी झाली हे मान्य आहे. पण आपला पोशिंदा जगला पाहिजे, यासाठी प्राधान्य द्यायला हवं. शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी मी रिकामाच असून, शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी दिल्लीत आवाज उठविण्यास तयार आहे. राज्य सरकारनं मला जबाबदारी द्यावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
आम्ही आजवर नवरात्रमध्ये कोल्हापूरमधून कधीच बाहेर पडलो नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी आदर्श घालून दिला आहे की, ‘आपला पोशिंदा संकटात असताना आणि त्याला जर त्रास होत असेल, तर राजेंना सुखानं राहायचा काही अधिकार नाही,’ अशी भूमिका खासदार संभाजी राजे यांनी मांडली. शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्याची लवकरच भेट घेणार असल्याचे देखील संभाजीराजे यांनी सांगितले.

*कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी.*

Previous articleदहिवड रामनगर परिसरात भवरी मळा येथे बिबट्याचे आगमन
Next article  *जिवलग मित्राचा अनैतिक संबधातून खूण*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here