Home Breaking News महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळानी राज्यपाल रमेश बैस यांची घेतली भेट राज्यातील...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळानी राज्यपाल रमेश बैस यांची घेतली भेट राज्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर केली विस्तृत चर्चा

58
0

आंशुराज पाटिल मुख्य कार्यालय

IMG-20231006-WA0056.jpg

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळानी राज्यपाल रमेश बैस यांची घेतली भेट
राज्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर केली विस्तृत चर्चा

युवा मराठा न्युज नेटवर्क महाराष्ट्र दिलीप बोंडे जालना जिल्हा ब्युरो चिफ

जालना  ः विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन राज्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर विस्तृत चर्चा केली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, चंद्रकांत हांडोरे, भाई जगताप, नसीम खान, माजी खा. हुसैन दलवाई, माजी आ. अशोक जाधव, आ. अमिन पटेल, आ. अस्लम शेख, आ. सिद्दीकी, संदेश कोंडविलकर, सचिन सावंत आदींची उपस्थिती होती.
राज्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे 48 तासांत 31 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 16 नवजात शिशुंचा समावेश आहे. तसेच शासकीय वैद्यकिय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे 24 तासात 14 जणांचा मृत्यू झालेला आहे. कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात महापालिकेच्या अनास्थेमुळे 24 तासांत 18 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तसेच नागपूर येथील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 23 जणांचा मृत्यू झालेला आहे, एकंदरीतच, राज्यातील आरोग्य व्यवस्था ही व्हेंटीलेटरवर असून शासनाच्या अनास्थेमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे दिसून येते. तरी राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यूंसंदर्भात निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची नेमणूक करावी. तसेच प्रत्येक मृत व्यक्तिच्या कुटुंबियांना प्रत्येकी रु. 10 लक्षची आर्थिक मदत करावी.
राज्यामध्ये तरुण बेरोजगारांची संख्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here