Home नांदेड जिजाऊ ब्रिगेड च्या तालुका अध्यक्ष पदी चैतन्या वानखेडे यांची निवड.

जिजाऊ ब्रिगेड च्या तालुका अध्यक्ष पदी चैतन्या वानखेडे यांची निवड.

25
0

आशाताई बच्छाव

IMG_20240403_204253.jpg

जिजाऊ ब्रिगेड च्या तालुका अध्यक्ष पदी चैतन्या वानखेडे यांची निवड.

देगलूर/प्रतिनिधी:-(गजानन शिंदे)

महाराष्ट्र हा आठरापगड जातीचा राज्य म्हणून ओळखलं जातं. गेल्या अनेक दिवसापासून जिजाऊ ब्रिगेड संपूर्ण राज्यात अतिशय जोमाने काम करत आहे. जिजाऊ ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष शिवमती सीमाताई बोके यांच्या सूचनेनुसार देगलूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून चैतन्या वानखेडे ह्या जिजाऊ ब्रिगेड मध्ये सक्रिय काम करत होत्या. त्याच्या मध्ये असलेले संघटन कौशल्य तसेच नेतृत्व करण्याच गुण लक्षात घेऊन त्याच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत त्यांना देगलूर तालुका जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
चैतन्या वानखेडे ह्या उच्च शिक्षित असून, त्या एका आदर्श शिक्षिका असून त्याच्या हातून ज्ञानदानाचा कार्य नेहमी होतं असते. त्याच्या हातून संघटनेचे संघटन वाढवे.
यावेळी जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिवमती सीमा ताई बोके ,प्रदेश कार्याध्यक्ष विभावरी ताई ताकट , राष्ट्रीय संघटक मुळे, प्रदेश संघटक डॉ.शितल ताई कल्याणकर ,प्रदेश प्रवक्ते विद्या ताई मडवई,विभागीय कार्याध्यक्ष मीनाक्षी ताई पाटील , नांदेड जिल्हा जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष उत्तर सुमित्राताई वडजकर यांच्या उपस्थितीत जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष दक्षिण पदी कल्पनाताई चव्हाण आणि जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष पदी चैतन्या ताई वानखेडे यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी जिजाऊ नवनिर्वाचित कार्यकारिणी शिवमती नंदा ताई देशमुख, शिवमती ज्योती ताई वरखींडे, शिवमती रंजना ताई मानुरे, शिवमती संतोष्री थडके, शीवमती शितल पाटील, शिवमती सत्यकला ताई जाधव , शिवमाती अनुताई बिरादार यांची उपस्थिती होती.

Previous articleआगामी सण व उत्सव शांततेत पार पाडावे -डी वाय एस पी गोसावी.
Next articleनांदेड दक्षिण मतदार संघातर्फे काँग्रेस ची बैठक.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here