Home कोल्हापूर कोल्हापूरात एस टी कर्मचारी वसाहतीत पन्नास हजाराची चोरी

कोल्हापूरात एस टी कर्मचारी वसाहतीत पन्नास हजाराची चोरी

184

राजेंद्र पाटील राऊत

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील छ. शिवाजी पार्कातील एसटी. आगाराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एसटी कर्मचारी निवासस्थानातील सुमारे पन्नास हजार रुपयाचे बांधकाम साहित्य अज्ञात चोरट्याने लोखंडी दरवाजा तोडून पळविले. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यामधे मनोज सुरेश लिंग्रस (वय ५४, रा. काटकर काॅलनी, राजारामपुरी) यांनी सोमवारी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झाला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महाराष्ट्र राज्य परिवहन,कोल्हापूर विभागाचे मध्यवर्ती बसस्थानकामागील बाजूस कर्मचारी निवासस्थान क्रमांक ४ आहे. या निवासस्थानामधील ॲल्युमिनियम खिडक्या, पाण्याचे काॅक, आरसा, इलेक्ट्रिक स्वीच बोर्ड, वाॅटर पंप, स्टार्टर आदी सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने लांबविले.
ही बाब कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली असता. त्यानुसार राज्य परिवहनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कर्मचारी काटकर यांनी शाहूपुरी पोलिसांत अज्ञाताविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा शोध शाहूपुरी पोलीस घेत आहेत.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleरत्नागिरी येथील छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन
Next articleमोदी सरकार कामाचे तास ९ वरून १२ तास करण्याच्या तयारीत !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.