• Home
  • एक शिस्तप्रिय व तत्वनिष्ट मुख्याध्यापक सेवानिवृत्त

एक शिस्तप्रिय व तत्वनिष्ट मुख्याध्यापक सेवानिवृत्त

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210329-WA0064.jpg

एक शिस्तप्रिय व तत्वनिष्ट मुख्याध्यापक सेवानिवृत्त
निमगांव,(विशाल हिरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- मुख्याध्यापक शाळेचा व्यवस्थापकीय सेनापती असतो व्यवस्थापकीय प्रमुखाचा सकारात्मक दृष्टीकोन असेल तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विकास होतो त्यामुळे पालक आणि समाजामध्ये शाळेबद्दल आपुलकी निर्माण होते असे आशयाचे मत उपप्राचार्य श्री.आर. जी. पाटील यांनी प्राचार्य श्री.आर.जे.निकम यांच्या सेवापूर्ती निरोप समारंभाच्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले.
निमगाव येथील टी.के.आर.एच. विद्यालयाचे प्राचार्य श्री.रत्नाकर निकम यांच्या सेवापूर्ती निमित्ताने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.मुख्याध्यापक पदाची जबाबदारी काटेरी मुकुट आहे परंतु मुख्याध्यापकाच्या कौशल्याने प्रशासकीय कामकाज केल्यास विद्यार्थी, शिक्षक, पालक व संस्था यांचे सक्रिय सहकार्य आपोआप मिळते असे मत सत्कारार्थी मनोगतात प्राचार्य श्री. रत्नाकर निकम यांनी व्यक्त केले.
सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून मर्यादित उपस्थितीत सेवापूर्ती सत्कार समारंभाचे आयोजन विद्यालयात करण्यात आले होते.
याप्रसंगी विद्यालयाच्या वतीने सेवापूर्ती सत्कारार्थी प्राचार्य श्री. रत्नाकर निकम यांच्या शाल, श्रीफळ, भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराचे औचित्य साधून पर्यवेक्षक श्री. जी.ए.शेवाळे, ज्येष्ठ शिक्षक श्री.एन.एम.मांडवडे, श्री. ई. एल. कन्नोर, श्री.आर.आर.शिंदे, इ. १० वीची विद्यार्थिनी कु. गायत्री खांडेकर यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. बी.बी.अहिरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. एस. एन. पवार, श्री. दीपक चव्हाण, श्री.दीपक खांडेकर, श्री. किरण पाटील, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.आर.ए. पवार यांनी केले.

anews Banner

Leave A Comment