Home अमरावती २ कोटी रुपयांच्या धनादेशप्रकरणी कारवाईला गती द्या: शिक्षक बँकेच्या दोनशेवर खातेदारांचे पोलीस...

२ कोटी रुपयांच्या धनादेशप्रकरणी कारवाईला गती द्या: शिक्षक बँकेच्या दोनशेवर खातेदारांचे पोलीस आयुक्तांना साकडे

40
0

आशाताई बच्छाव

IMG_20240321_191617.jpg

२ कोटी रुपयांच्या धनादेशप्रकरणी कारवाईला गती द्या: शिक्षक बँकेच्या दोनशेवर खातेदारांचे पोलीस आयुक्तांना साकडे
———
दैनिक युवा मराठा .
पी.एन. देशमुख.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
अमरावती.
दोन कोटी रुपयांच्या धनादेश प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या चौकशीत गती द्यावी, अशी मागणी करीत सुमारे 200 वर खातेदारांनी आज, पोलीस आयुक्त डॉ. नवीनचंद्रा रेड्डी यांना साकडे घातले. या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार अद्याप न गव या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली असून तपास यंत्रणा अधिक गतिमान करावी, असा आग्रह धरला आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत व्यारासाठी संबंधित जि.प. शिक्षक सहकारी बँक स्थापना केली आहे. पश्चिम विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात या बँकेचे जाळेआहे. या बँकेचा दोन कोटी रुपयांचा एक धनादेश गेल्या महिन्यात एसबीआयच्या कॅम्प शाखेत पोहोचला होता. बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या परिचित एका सहकार्यासह दोन व्यक्तींनी हा चेक वटविण्याचा प्रयत्न केला. परंतु एसबीआय मधील अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तो प्रयत्न ठळला आणि त्याचवेळी संबंधित दोघांनी बँकेतून पलायन केले. रक्कम मोठी असल्यामुळे एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी संबंधित धनादेशाची बँकेकडून पडताळणी केली. विचारतो सुरू असतानाच असा कोणताही धनादेश बँकेमार्फत कोणाला देण्यात आला नसल्याचे सीईओंनी सांगितले. मात्र त्याचवेळी संबंधित धनादेश सुमारे ६ महिन्या आधी बँकेतून गाहाळ झाल्याचेही स्पष्ट केले. अशाप्रकारे या प्रकरणाची गुंतागुंत वाढत गेल्यामुळे पुढे हे प्रकरण पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे पोहोचले. दरम्यान आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. असून त्यांची प्राथमिक चौकशी केली आहे. परंतु चौकशी दरम्यान त्यांच्याकडून प्राप्त माहिती आधारे पुढील धागेद्वारे पोलिसांना यश आले नाही, असे संबंधित तक्रारदार बँक सभासदांचे म्हणणे आहे. त्यामुळे अमरावती सह अचलपूर, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, भातकुली, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर आधी तालुक्यातील खातेदारांनी संयुक्त तक्रार करत या प्रकरणातील बडे मासे शोधून काढावेत, अशी मागणी केली आहे. त्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी, असेही या सभासदांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here