Home जालना चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत घनसावंगीत भाजपची जाहीर सभा

चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत घनसावंगीत भाजपची जाहीर सभा

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20230626-WA0036.jpg

चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत घनसावंगीत भाजपची जाहीर सभा

घनसावंगी/जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ)-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप शासित केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली. नऊ वर्षाच्या कार्यकाळात मोदी सरकारने देश व  जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाची व जनकल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी देशभरात महा -जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. परभणी लोकसभा मतदारसंघअंतर्गत असलेल्या  घनसावंगी विधानसभा मतदारसंघात भाजपचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर  बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थित १ जुलै रोजी घनसावंगी शहरात जाहीर सभा होणार आहे.
या सभेला परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्व आजी- माजी आमदार, जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी, सर्व मोर्चा व आघाड्याचे  पदाधिकारी, पक्षाचे विधानसभा प्रमुख ते बूथ प्रमुखापर्यंतचे सर्व कार्यकर्ते उपस्थीत राहणार आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघाच्या संयोजक आमदार मेघनाताई बोर्डीकर, घनसावंगी विधानसभा निवडणूक प्रमुख सतीश घाटगे पाटील, घनसावंगी विधानसभा संयोजक माजी आमदार विलासबापू  खरात , लोकसभा मतदारसंघाचे सहसंयोजक सुनील आर्दड हे  सभा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here