Home जालना घनसावंगी मतदारसंघातील गावागावात पोहचणार मोदी सरकारच्या योजना संजयजी कौडगे: जनकल्याणकारी योजना घराघरात...

घनसावंगी मतदारसंघातील गावागावात पोहचणार मोदी सरकारच्या योजना संजयजी कौडगे: जनकल्याणकारी योजना घराघरात पोहोचवण्याचा संकल्प

38
0

आशाताई बच्छाव

IMG-20230626-WA0040.jpg

घनसावंगी मतदारसंघातील गावागावात पोहचणार मोदी सरकारच्या योजना

संजयजी कौडगे: जनकल्याणकारी योजना घराघरात पोहोचवण्याचा संकल्प

घनसावंगी/जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ९ वर्षे पूर्ण केली. या कार्यकाळात मोदी सरकारने देशातल्या प्रत्येक घटकाला समृद्ध करणाऱ्या जनकल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत. या योजना घनसावंगी मतदारसंघातील गावागावांत पोचविण्याचा संकल्प घनसावंगी येथे महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत आयोजित संयुक्त मोर्चाच्या बैठकीत भाजप नेते व पदाधिकाऱ्यांनी केला.
भाजपचे संघटन मंत्री संजयजी कौडगे यांनी या बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. माजी आमदार विलासबापू खरात यांच्या अध्यक्षतेखाली नृसिंह मंगल कार्यालयात रविवारी ही आढावा बैठक झाली. या बैठकीस समृद्धी शुगर ली. चे चेअरमन तथा घनसावंगी मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख सतीश घाटगे पाटील, भाजपचे प्रदेश निमंत्रित सदस्य सुनील आर्दड यांची प्रमुख उपस्थिती होती.  शेतकरी केंद्रस्थानी ठेऊन घनसावंगी मतदार संघात २२० किलोमीटरचे  पाणंद रस्ते खुले करून शेतकऱ्यांसमोरील मोठी अडचण दूर केल्याबद्दल संजयजी कौडगे यांनी सतीश घाटगे पाटील यांचे विशेष कौतुक केले. शेतीला उद्योगाचा दर्जा प्राप्त करून देऊन  शेती समृद्ध करण्याचा प्रयन्त केंद्र व राज्यातील भाजप सरकार करत आहे. त्यासाठी महत्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आल्या आहे. त्याचा लाभ जनतेला मिळवून देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या क्षेत्रात या योजनेचा प्रचार आणि प्रसार करावा. असे आवाहन विलासबापू खरात यांनी आपल्या भाषणातून केले .
बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मेळाव्यातून रोजगार उपलब्ध करून देण्यात  येत आहे.

Previous articleचंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत घनसावंगीत भाजपची जाहीर सभा
Next articleयेणारा प्रत्येक दिवस सर्वसामान्य माणसाचा ! त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करत राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here