Home अमरावती रुग्णालयातील निकृष्ट जेवणाबाबत आमदार रवी राणा यांनी केली अधिकाऱ्यांची कान उघडणी.

रुग्णालयातील निकृष्ट जेवणाबाबत आमदार रवी राणा यांनी केली अधिकाऱ्यांची कान उघडणी.

102
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230627-051026_WhatsApp.jpg

रुग्णालयातील निकृष्ट जेवणाबाबत आमदार रवी राणा यांनी केली अधिकाऱ्यांची कान उघडणी.
दैनिक युवा मराठा
वृत्तसेवा..
पी.एन. देशमुख
ब्युरो चीफ रिपोर्टर
अमरावती.
अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध समस्या पाहून बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली. रुग्णालयात रुग्णांची होणारे हाल पाहून आपण आमदार असल्याची लाज वाटत असल्याचे ही त्यावेळी म्हणाले. तसेच रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण देत असल्याचा आरोप करत तेच जीवन संबंधित अधिकाऱ्यांना भरवून राणा यांनी संताप व्यक्त केला. आमदार रवी राणा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट दिली असता रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता, औषधीचा तुटवडा, एका बेडवर दोन रुग्ण व रुग्णांना मिळणारे निकृष्ट दर्जाचे जेवण, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा अशा विविध समस्यांचा डोंगर पाहून संताप व्यक्त केला. दोन महिन्यापूर्वीच यांनी रुग्णालयाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी जिल्हा चिकित्सा कांना विविध समस्येचे प्रस्ताव पाठविण्यास सांगितले होते. परंतु दोन महिन्यानंतरही रुग्णालयातील समस्या कायम असल्याने त्यांनी संतप्त व्यक्त केला. यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता पाहून त्यांनी कर्मचाऱ्यांची विचारणा केली. यावेळी फक्त १४ स्वच्छता कर्मचारीच कर्तव्यावर असल्याचे आढळून आले. यानंतर औषधाची ही मुद्दा उपस्थित केला. त्याचबरोबर रुग्णांना मिळणारे जेवण त्यांनी मागून करपलेली पोळी व निकृष्ट दर्जाची डाळ संबंधित अधिकाऱ्यांना भरूवुन चांगले धारेवर धरले. ही भेट माणुसकीची आहे परंतु यानंतर ही जर रुग्णालयातील समस्या कायम राहिल्या तर अधिकाऱ्यांना जोडपल्याशिवाय राहणार नसल्याचे बडनेरा मतदारसंघाचे आमदार राणा म्हणाले.

Previous articleदेशातील श्रीमंतांचे निर्गमन – एंड. आकाश सपेलकर – अध्यक्ष ऑल इंडिया रिपोर्टर्स असोसिएशन
Next articleचंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत घनसावंगीत भाजपची जाहीर सभा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here