Home नांदेड शंकरनगर येथे खाजगी डॉक्टरांनी वापरलेली इंजेक्शन नष्ट न करता टाकले उघड्यावरच चौकशीसाठी...

शंकरनगर येथे खाजगी डॉक्टरांनी वापरलेली इंजेक्शन नष्ट न करता टाकले उघड्यावरच चौकशीसाठी वरिष्ठाकडे तक्रार…

164
0

राजेंद्र पाटील राऊत

शंकरनगर येथे खाजगी डॉक्टरांनी वापरलेली इंजेक्शन नष्ट न करता टाकले उघड्यावरच चौकशीसाठी वरिष्ठाकडे तक्रार…
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार. (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
शंकरनगर
खाजगी असो की शासकीय रुग्णालय असो रुग्णालयात रुग्णांसाठी वापरण्यात आलेली इंजेक्शन व मेडिसिन हे कुठेही उघड्यावर न टाकता ती नष्ट केली पाहिजे असे शासनाचे आदेश असताना शासनाच्या या आदेशास केराची टोपली दाखवून शंकर नगर तालुका बिलोली येथे कार्यरत असलेल्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टर हे वापरलेले इंजेक्शन व मेडिसिन उघड्यावर टाकत असल्याने उघड्यावर टाकलेल्या इंजेक्शन व मेडिसिनचा अनेकांना धोका होऊ शकतो यासाठी उघड्यावर वापरण्यात आलेली इंजेक्शन व मेडिसिन टाकणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टरची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील वाडेकर यांनी बिलोली तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडे केली आहे.
सविस्तर माहिती अशी की प्रत्येक रुग्णालयात रुग्णासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन व मेडिसिन हे कुठेतरी रुग्णालयाबाहेर जाळून किंवा जमिनीत गाडून नष्ट केली पाहिजे असे शासनाचे आदेश असताना शंकरनगर तालुका बिलोली येथे मात्र कोरोना महामारी संकटात भयभीत असलेले नागरिक मोठ्या प्रमाणात खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत असताना अशा रुग्णांना वापरलेली इंजेक्शन व मेडिसिन कुठेही नष्ट न करता इंजेक्शन व मेडिसिन वर्दळीच्या ठिकाणी बिनधास्तपणे उघड्यावरच टाकून आपली बेजबाबदारपणा दाखवत असल्याने अशा या वापरलेल्या इंजेक्शन व मेडिसिनचा सामान्य नागरिकांना किंवा जनावरांना धोका होऊ शकतो यासाठी वापरलेली मेडिसिन व इंजेक्शन उघड्यावर टाकणाऱ्या शंकरनगर येथील खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी असे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष हनुमंत पाटील वाडेकर यांनी बिलोली येथील तालुका आरोग्य अधिकारी गणपत वाडेकर यांच्याकडे दूरध्वनीद्वारे केले असता या घटनेची नोंद घेऊन रामतीर्थ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून उघड्यावर टाकलेल्या मेडिसिन व इंजेक्शनचा रीतसर पंचनामा करून सदरील अहवाल मागवले असल्याने वापरलेले इंजेक्शन व मेडिसिन उघड्यावर टाकणाऱ्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टर विरुद्ध काय कारवाई होणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
वापरलेली इंजेक्शन व मेडिसिन उघड्यावर टाकता येत नाही ती नष्ट केलीच पाहिजे त्यासाठी रामतीर्थ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगून वापरलेली इंजेक्शन व मेडिसिन उघड्यावर टाकणाऱ्या विरुद्ध ग्रामपंचायतीच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यात यावे असे ग्रामपंचायतीस पत्र देणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी गणपत वाडेकर यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.

Previous articleमुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश राज्यात रेमडीसीव्हीरचा पुरवठा वाढला —– मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे आभार
Next articleडोंबिवली रुग्णालयात लिफ्ट कोसळल्याने चार जखमी 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here