Home उतर महाराष्ट्र “मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही”; इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर राजेश टोपे...

“मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही”; इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर राजेश टोपे नाराज..?,

163
0

राजेंद्र पाटील राऊत

“मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही”; इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर राजेश टोपे नाराज..?,

ठाणे (अंकुश पवार, सहसंपादक,ठाणे/युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी करोना लसीबद्दल एक विधान केल्याने खळबळ उडाली आहे. मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही, असे विधान इंदुरीकर महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील एका कार्यक्रमात केले आहे. गोपाळरावजी गुळवे यांच्या ८१व्या जयंतीनिमित्ताने घोटी कृषी उत्पन बाजार समितीत शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराज यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

दरम्यान कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी लसीचे महत्व पटवून देतो, अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राजेश टोपे म्हणाले, “इंदुरीकर महाराज हे माझ्या अत्यंत जवळच्या परिचयाचे आहेत. ते उत्कृष्ठ पद्धतीने समाजाचे प्रबोधन करतात. कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला चांगला संदेश देतात. त्यामुळे लोक त्यांच्या कीर्तनाला मोठी गर्दी करतात. त्यामुळे मी त्यांना (इंदुरीकर महाराज यांना) जागतिक स्तरावर लसीला असलेले महत्व समजावून सांगेल.”

“ज्याची त्याची प्रतिकार शक्ती वेगळी आहे हे कळायला नको का. प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता देखील वेगळी आहे. मी सगळीकडे फिरतो. मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन करायचे काय? करोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा. १४ वर्षे राम वनवासाला गेले होते तर सीतेला सोबत घेऊन गेले होते. इथे राम १४ दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेने डोकावून पाहिले नाही,” असे इंदुरीकर महाराज यांनी म्हटले आहे.

यापुर्वी देखील प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. इंदुरीकर महराज यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत इंदुरीकर महारांज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यासंदर्भात त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

Previous articleमहावितरण कंपनीचा बोगस कारभार..! ५००० कंत्राटी कामगारांची दिवाळी अंधारात, बोनस राहिला पगार सुधा नाही
Next articleपुलावरिल संरक्षक लोखंडी कठळे गायब।   
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here