• Home
  • 🛑 खासदार नवनीत राणा यांना श्वास घ्यायला होतोय त्रास….! उपचारासाठी मुंबईत दाखल 🛑

🛑 खासदार नवनीत राणा यांना श्वास घ्यायला होतोय त्रास….! उपचारासाठी मुंबईत दाखल 🛑

🛑 खासदार नवनीत राणा यांना श्वास घ्यायला होतोय त्रास….! उपचारासाठी मुंबईत दाखल 🛑
✍️ अमरावती 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

अमरावती :⭕ अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची प्रकृती आणखीच बिघडल्याची माहिती समोर येते आहे.

त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ नागपूरवरून मुंबईला उपचारासाठी रवाना करण्यात आलं आहे. काही दिवसांपुर्वी खासदार नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 12 जणांना कोरोनाची लागण झाली होती.

त्यामुळे त्यांना उपचारासाठी अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

तेथे त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांची प्रकृती बिघडत असल्याने त्यांना तात्काळ नागपूरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मात्र नागपुरात अधिकच प्रकृती बिघडल्यानं तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानं आता त्यांना मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान नवनीत राणा यांची प्रकृती खालवल्याची बातमी समोर आल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे….⭕

anews Banner

Leave A Comment