Home नाशिक निराधार वीरांगना सन्मान योजना तसेच असंघटित घरेलू कामगारांनी सरकारी योजनांचा लाभ घ्यावा...

निराधार वीरांगना सन्मान योजना तसेच असंघटित घरेलू कामगारांनी सरकारी योजनांचा लाभ घ्यावा —

66
0

आशाताई बच्छाव

IMG_20240322_092217.jpg

निराधार वीरांगना सन्मान योजना तसेच असंघटित घरेलू कामगारांनी सरकारी योजनांचा लाभ घ्यावा —

सौ स्मिताताई कुलकर्णी यांचे लाभार्थी महिलांना आवाहन

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

समाजातील निराधार घटकांसाठी वीरांगना सन्मान योजना सुरू करण्यात आली असून यात मासिक तीन हजार रुपये पेन्शन खात्यात जमा होणार आहे तसेच असंघटित घरेलू कामगार यांच्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण महामंडळ अंतर्गत असंघटित कामगार नोंदणी व त्यांचे लाभ देण्यात येणार असून सरकारी योजना घराघरात पोहोचवून नारीशक्ती सक्षमीकरणासह आर्थिक उदात्त धोरण राबविण्यात येणार आहे. पूर्वीच्या बचत गट व लाभार्थी सवलत व त्यातील उंचावलेला आलेख तसेच गोणी कामगार घरेलू कामगार यांच्याशी एक सामाजिक बांधिलकी कर्तव्याची नाळ जुळली आहे देश विकसित उत्कर्षाचा मुख्य प्रवाह महिला आहेत त्यांच्या आरोग्य शैक्षणिक आर्थिक सुविधा यांसाठी घराघरात सरकारच्या योजना नुसत्या पोहोचवणार नसून त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

मोफत नोंदणी वीरांगना (विधवा) साठी लागणारी कागदपत्रे यादी
१) आधार कार्ड झेरॉक्स प्रत.
२) पतीचा मृत्यूचा दाखला प्रत.
३) रेशन कार्ड झेरॉक्स प्रत.
४) मतदान कार्ड झेरॉक्स प्रत.
५) दोन पासपोर्ट साईज फोटो
६) राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स
७) रहिवासी दाखला स्वयं घोषणा पत्र.

असंघटित व घरेलू कामगारांसाठी लागणारी कागदपत्रे यादी
१) आधार कार्ड झेरॉक्स प्रत.
२) रेशन कार्ड झेरॉक्स प्रत.
३) मतदान कार्ड झेरॉक्स प्रत.
४) तीन पासपोर्ट साईज फोटो
५) राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स
६) नोंदणी शुल्क रु. २००/-
७) मालकाचे प्रमाणपत्र
८) रहीवासी दाखला स्वयं घोषणा पत्र

सर्व झेरॉक्स २ प्रत व सही केलेले असावे व त्यावर मोबाईल नंबर लिहावा.वीरांगना सन्मान योजनेत कोणतेही शुल्क नाही याबाबत ब्राह्मण महासंघ विश्वस्त सौ स्मिताताई कुलकर्णी मो. 9881366497 यांच्याशी संपर्क साधावा.

Previous article२ कोटी रुपयांच्या धनादेशप्रकरणी कारवाईला गती द्या: शिक्षक बँकेच्या दोनशेवर खातेदारांचे पोलीस आयुक्तांना साकडे
Next articleसुनील थोरात पंचाळे ग्रा पं च्या उपसरपंचपदी बिनविरोध
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here