Home उतर महाराष्ट्र बोगस पशुवैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला, माळमाथा परीसरातील पशुपालकांची होते अर्थिक...

बोगस पशुवैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला, माळमाथा परीसरातील पशुपालकांची होते अर्थिक लुटमार …

79
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220618-063530_Google.jpg

बोगस पशुवैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला, माळमाथा परीसरातील पशुपालकांची होते अर्थिक लुटमार …
वासखेडी/धुळे,(दिपक जाधव प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) – येथील माळमाथा परीसरात बोगस पशुवैद्यकिय डॉक्टरांचं बोगस असलेले दुकान प्रशासनाने कार्यवाही करून पशुपालकांची व शेतकर्याची होणारी लुट थांबवावी अशी मागणी माळमाथा तसेच परीसरातुन जोर धरू लागली आहे,
“पशु सेवा हीच ईश्वर सेवा” हा मुलमंत्र देणारे पशुसंवर्धन विभागाचे प्रशासकीय अधिकारी आहेत तरी कुठे ,ही चर्चा ही परीसरात होतांना दिसते, जिल्हयातील बोगस पशुवैद्यकिय सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला असुन तो संबधित जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तथा जिल्हा पशुधन अधिकारी असतील यांनी हाती घेऊन होणारी पशुपालक,शेतकरी यांची लुट थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत हीच अपेक्षा शेतकरी वर्गाकडुन केली जात आहे,मुक्या प्राण्यांना जीवदान देण्या ऐवजी बोगस पशुवैद्यकीय सेवा देणारे डॅाक्टर दिवसा मृत्युदान देताय हा अधिकार दिला तरी कोणी यांना असा प्रश्न जनतेकडुन होतांना दिसतोय,प्रशासनाची कुठलीही वचक राहीलेली नाही आहे ,हे आजचे नागरीक भोगतांना दिसताय,परीसरातील शेतकरी म्हणता बोगस वैदयकीय डॉक्टरांचा बिल्ला घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आर्थिकदृष्टय़ा मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खेळ खेळत लुट करतांना सरेआम दिसताय याकडे प्रशासनाचे कुठलेही लक्ष नसल्यामुळें आर्थिक लुट होते यासाठी शेतकरी पशुपालक उदास आहे,काही दिवसापुर्वी बोगस डाॅक्टरांच्या हलगर्जी पणामुळे संसर्गित आजारामुळे परीसरातील, म्हशी,गायी,वासरूनां आपला जीव गमवावा लागला तरी प्रशासन आंधळे आहे,आजार छोटे पण उपचार मात्र दहा पटीने मोठे त्यातुन जनावर दगावतो याला काय म्हणावे,वासखेडी, छडवेल-कोर्डे, दहीवेल, कोंडाईबारी,पिंपळनेर,आमळी,पिंझारझाडी,खुडाणे,आदी गावातुन काही वर्षापासुन पशुवैद्यकीय क्षेत्रातील बोगस गिरी फावते आहे, असच काही कळत नसल्याने पशुपालकांनी व शेतकर्यानी जीवापेक्षा जास्तं जपलेल्या मुक्या प्राण्यांना व दबंगगिरी करणाऱ्या डाक्टरांमुळे मुक्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागतोय,त्यातुन पशुपालकांची मोठी लुट होतांना दिसते आहे,तरी प्रशासनाने याकडे गांभिर्याने पहावे व होणारी लुट तसेच पशुंच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर योग्य ती कार्यरवाही करावी हीच मागणी परीसरातील पशुपालक वर्ग व शेतकरी होतांना दिसतोय..

Previous articleसंग्रामपुर कृषी अधिकारी जोमात तालुक्यातील शेतकरी मात्र कोमात!
Next articleजि.प.शाळा नेहरू नगर येथे नवागतांचे स्वागत.     
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here