Home बुलढाणा संग्रामपुर कृषी अधिकारी जोमात तालुक्यातील शेतकरी मात्र कोमात!

संग्रामपुर कृषी अधिकारी जोमात तालुक्यातील शेतकरी मात्र कोमात!

85
0

आशाताई बच्छाव

IMG-20220617-WA0049.jpg

संग्रामपुर कृषी अधिकारी जोमात तालुक्यातील शेतकरी मात्र कोमात!

विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील दांदळे

संग्रामपुर:- तालुक्यात महाडीबीटी अंतर्गत खरीप हंगामात सोयाबीन पिका करीता 1092 शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे करता ऑनलाईन अर्ज केले होते त्यापैकी 22 गावातील 418 शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाल्याचे SMS शेतकऱ्यांना दिनांक 10 जून 2022 रोजी पासुन मोबाईलवर मिळाले त्यावर शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केल्याप्रमाणे त्यांना फुले संगम बियाणे मिळणार असल्यामुळे या बियाणे पेरणी करतात शेतीची मशागत केली व आज दिनांक 17जुन 2022रोजी बियाणे घेण्याकरता तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात शेतकरी गेले असता चक्क तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोड यांनी बियाणे देण्यास नकार दिला व SMS चुकीने आले आणि वरिष्ठ पातळीवरून जे लाभार्थी निवडण्यात आले ज्या शेतकऱ्यांना एस एम एस आले त्यांना बियाणे मिळणार नाही असे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनावर फार मोठा आघात झाला असून शेतकऱ्यांची फसवणूक झाली म्हणून तालुक्यातील मोमिनाबाद येथील शेतकरी ग्रा.पं सदस्य अमोल पाटील जवंजाळ व इतर शेतकरी तालुका कृषी अधिकारी संग्रामपूर यांना बियाण्याची मागणी करत आहेत. आणि बियाणे मिळणार नसल्यास शेतकरी फार मोठ्या संकटात सापडणार असल्यामुळे बियाणे मिळाल्या शिवाय कार्यालयातून जानार नाही असा पवित्रा घेत उपस्थित शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी संग्रामपूर त्यांच्याकडे निवड झालेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे मिळणे साठी तक्रार अर्ज दिला असून सदर तक्रारीची प्रत तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर साहेब यांच्या कडे सुद्धा दिली त्यावेळी तहसील कार्यालय येथून स्वतः तहसीलदार वरणगावकर साहेबांनी कृषी अधिकारी अमोल बनसोड यांना फोन करून संबंधित तक्रार बद्दल जाब विचारला व ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आले त्यांना आपण बियाणे उपलब्ध करून द्यावे त्यांना बियाणे न दिल्यास एका प्रकारे लाभार्थी शेतकऱ्यांची फसवणूक होणार त्यामुळे आपण सदर बियाण्याची मागणी वरिष्ठ पातळीवर करून शेतकर्‍यांचे समाधान करावे असे भ्रमणध्वनीवरून सांगितले .परंतु कृषी अधिकारी हे स्वतःच्याच निर्णयावर ठाम असल्याचे दिसून येते. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर कृषी अधिकारी अमोल बनसोड यांना संबंधित माहिती विचारली असता त्यांची बोलती बंद झाली होती व त्यांनी मौन धारण केले होते. आणि काहीच माहिती देऊ शकले नाही. एका प्रकारे बरेच दिवसापासून कृषी विभागाचा कारभार हा *हम करे सो कायदा* अशा प्रकारे कृषी विभागामार्फत चालू असल्याचे दिसून येत आहे. आणि खरोखरच गरजू शेतकर्‍यांना लाभापासून वंचित ठेवल्या जात असून *कर भला सो हो भला* अशा पद्धतीने काही लोकांना लाभ देण्यात येत असल्याचे सुद्धा शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे. अखेर सर्व शेतकरी सकाळपासून रात्रीच्या आठ वाजेपर्यंत कृषी अधिकारी संग्रामपूर यांच्या कार्यालयात बियाणे करता थांबले होते. त्यामुळे कृषी अधिकारी बनसोड यांनी जिल्हा कृषी अधिकारी बुलढाणा यांच्याकडे निवड झालेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे मिळावे याकरिता लेखी स्वरूपात मागणी केली. आणि उपस्थित प्रत्येक शेतकऱ्यांना फक्त आठ किलो सोयाबीन बियाण्याची बॅग देण्यात आली आणि सर्व शेतकरी तिथून निघून गेले परंतु सोयाबीन बियाणे करता निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांना वरिष्ठांनी दखल घेऊन सोयाबीन बियाणे पेरणीपूर्वी वेळेवर उपलब्ध करून द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Previous articleतर पुन्हा लाँकडाऊन शक्य? करोना नियम
Next articleबोगस पशुवैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला, माळमाथा परीसरातील पशुपालकांची होते अर्थिक लुटमार …
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here