Home उतर महाराष्ट्र तर पुन्हा लाँकडाऊन शक्य? करोना नियम

तर पुन्हा लाँकडाऊन शक्य? करोना नियम

52
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220617-203852_Google.jpg

तर पुन्हा लाँकडाऊन शक्य? करोना नियम धाब्यावर प्रशासन मात्र राम भरोसे,वचक राहीला तरच चौथी लाट होईल दुर…!

वासखेडी/धुळे (दिपक जाधव प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) – नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणुन त्याची ओळख आहे,त्याच जिल्हयात प्रशासनाचे करोना नियमाने तीन तेरा वाजवले आहेत,कुठलीही प्रशासनाची दहशत राहीलेली नाही म्हणुन प्रशासन सुस्त आहे,कोणाच्याही तोंडावर मास्क नाही म्हणुन प्रशासनाची बेपरवाही बघावयास मिळत आहे,मागील वर्षाची आठवण बघता अनेक,बांधवानी करोना संसर्गातून जगाचा निरोप घेतला,ते दिवस परत येऊ नयेत यासाठी जनतेनेही आपली काळजी घेणे गरजेचे आहे.पण प्रशासनाने ही जागे होत दंडात्मक कार्यवाही केल्यास येणारी चौथी लाट परत येणार नाही यासाठी काही एक उपाय योजना करणे गरजेचे आहे,जर मा,जिल्हाधिकारी यांनी वेळीच उपाय योजना केल्या नाहीत,तर येणारी चौथी लाट नंदुरबार जिल्हयात आल्या खेरीज राहणार‌ नाही,शहरात,रेल्वे
,बस,लक्झरी, खासगी प्रवासी आदी वाहतुकीच्या साधनांनी मुंबई,पुणे,नाशिक,गुजरात मध्यप्रदेश येथून अनेक प्रवासी प्रवेश करत असता,पण प्रशासनिक नियम धाब्यावर ठेवत चौथी लाटेची प्रतिक्षा नंदुरबारकर करता आहेत की काय?असा प्रश्न निर्माण होतो,प्रशासनाने नियोजीत बैठका घेत योग्य निर्णय घेतला नाही,तर भविष्यातल्या येणाऱ्या चौथ्या लाटेसाठी आपणांस कोणीही वाचवु शकत नाही,वेळोवेळी मा,आरोग्यमंत्री राजेश टोपे जनतेला सतर्क राहण्याचे आव्हान करतात,त्याचा विसर जनतेपेक्षा तर प्रशासनाला पडलेला दिसतो,जनतेला कोणताही वचक राहीलेला नाही सगळे हवालदिल झालेले आहेत,हे बघता प्रशासनाचे सगळे नियम धाब्यावर ठेवल्याचे प्रथम दर्शी निदर्शनास आले,अटीजन रॅपिड टेस्ट होतांना कधीही दिसत नाही,हजारो लोक,मुंबई,पुणे,गुजरात,मध्यप्रदेशातुन नंदुरबार येथे येत असता,मजुर वर्ग ही मोठ्या प्रमाणावर कामासाठी शहरात येतात,तरीही प्रशासनाचे डोळे बंद का? प्रशासन सुस्त ढेरी जबरदस्त कोणीही संबधित जिल्हा आरोग्य अधीकारी अगदी बिनदास्त जिल्हाधिकारी,प्रांताधिकारी तहसिलदार,यांना करोना चा विसर पडल्याचे स्पष्टं चित्र बघावयास मिळाले,कारण कुठलीही करोना विषयी आजपावेतो उपाय योजना अंमलात येतांना दिसलीच नाही,मग समजायचे तरी काय ?हे जनता जेव्हा विचारेल तेव्हा प्रशासनाचा वेळ निघुन गेलेला असेल असे म्हटले तर काय वावगे काय आहे,पावसाळा सुरू झाला तरीही प्रशासन अगदी झोपलेले आहे,पावसाळयांत साथीचे रोग पाय ठेवुन येण्यास सज्ज झाले,प्रशासनाच्या स्वागतासाठी मागील वर्षी लोकांनी आपले नातेवाईक गमावले तीच परस्थिती पुन्हा येऊ शकते,मग प्रशासनाने योग्य तो निर्णय वेळेवर चौथी संभाव्य लाट दुर होईल,हे प्रशासनाने लक्षात घेतले ,राज्याचे,मुख्यमंत्री,उध्दव ठाकरे साहेब,उपमुख्यमंत्री अजित पवार,व आरोग्य मंत्री,मा,राजेश टोपे साहेब आदींनी वेळोवेळी आव्हाने देखील केली आहेत,तरीही अधिकारी यांची झोप ,आर टी,पि सी टेस्ट चे प्रमाण दुप्पट करण्या‌चे आदेश दिले आहेत,तरी प्रशासनाने मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री,आरोग्य मंत्री ,नेहमी म्हणतात कि,नेहमी प्रमाणे परस्थिती वाईट झाल्यावर संचारबंदीचे निर्णय शिथील केल्यास परस्थिती बदलु शकते असा आदेश केला आहे,वर्ल्ड हेल्थ आर्ग नायजेशन या संस्थेने जुन महीन्यात चौथी लाट येण्याची शक्यता आहे,प्रशासन व जनताही तेवढेच लक्षात घेतले
प्रतिबंधक,कायदा लागु असतांना संबथित जिल्हाधिकारी कार्यालयातील,आपत्ती व्यवस्थापन कक्षच चोरीला गायब झाल्याचे ग्रामिण संबधित भागातील ,जिल्हा आरोग्य अधिकारी उपाय योजना करणां्यात निष्क्रीय आहेत ग्रामिण भागातील करोना चाचण्या घेतल्या जातात कि नाही यात खुप मोठी शंका आहे,ग्रामिण चे पेंशट शासकीय जिल्हा रूग्णाकडे पाठविले जातात,म्हणुन मागील वर्षी अनेक करोना योध्दा मृत्यु ही झालेला मग या परस्थिती त अनेक पेशंटच्या नातेवाईकांकडुन‌ पैसेही लाटले जातात म्हणुन प्रशासनाने त्वरीत उपाय योजना न केल्यास चौथी लाट सुरू झाल्यास
राहणार‌ नाही
हे लक्षात ठेवले पाहीजे

Previous articleविविध विकास कामाबाबत घेतला आढावा, कामचुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही खा.अशोकजी नेते.
Next articleसंग्रामपुर कृषी अधिकारी जोमात तालुक्यातील शेतकरी मात्र कोमात!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here