• Home
  • विश्वास राऊत यांचे दुःखद निधन

विश्वास राऊत यांचे दुःखद निधन

*विश्वास राऊत यांचे दुःखद निधन*
मनमाड,( प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-“युवा मराठा न्युज” चँनलचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांचे चुलत भाऊ आणि मनमाड ता.नांदगाव येथील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व आणि रेल्वेचे सेवानिवृत कर्मचारी विश्वास दगडू राऊत तथा बाबू राऊत यांचे आज पहाटे आकस्मिकरित्या निधन झाले.
विश्वास राऊत हे एक मितभाषी व मनमिळाऊ व्यक्तीमत्व म्हणून मनमाड शहराला सुपरिचीत होते.त्यांनी आपल्या कर्तबगारीचा ठसा विविध क्षेत्रात उमटविलेला होता.त्यांच्या निधनाने “युवा मराठा न्युज”परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असून,एक मार्गदर्शक पाठीराखा हरपल्याची सहवेदना” युवा मराठा न्युज”आपल्या टिव्टवर केली आहे.विश्वास राऊत यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.विश्वास राऊत यांच्या कुटूंबियावर कोसळलेल्या या दुःखात युवा मराठा परिवार सहभागी असून,ईश्वर मृतात्म्यांस चिरशांती देवो हिच “युवा मराठा” परिवाराची भावपुर्ण श्रध्दांजली!
-व्यस्थापकीय संपादक
युवा मराठा न्युज चँनल

anews Banner

Leave A Comment