Home अमरावती राज्यात”प्रहार ची”स्वातंत्र्य ताकद: वेळ पडल्यास आम्ही महायुतीला झटका देऊ, प्रहार संघटनेचेआ. बच्चू...

राज्यात”प्रहार ची”स्वातंत्र्य ताकद: वेळ पडल्यास आम्ही महायुतीला झटका देऊ, प्रहार संघटनेचेआ. बच्चू कडू यांचा इशारा.

28
0

आशाताई बच्छाव

IMG_20240321_191339.jpg

राज्यात”प्रहार ची”स्वातंत्र्य ताकद: वेळ पडल्यास आम्ही महायुतीला झटका देऊ, प्रहार संघटनेचेआ. बच्चू कडू यांचा इशारा.
————
दैनिक युवा मराठा
दि.२१
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी सत्ताधारी महायुतीला लोकसभा निवडणुकीत धक्का देण्याचा तसेच वेळ प्रसंगी दणका देण्याचा इशारा दिला आहे. आमची त्यांना मदत करण्याची तयारी होती. पण त्यांनाच आम्ही त्यांच्याबरोबर नको असल्याचे दिसून येत आहे. असे असेल तर आम्ही त्यांना आमचा झटका दाखवू, वेळप्रसंगी दणकाही देऊ, असे ते म्हणाले. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीने अमरावती पक्षाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीची रणनीती ठेवली जाणार आहे. या बैठकीपूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला आसमान दाखवण्याचा इशारा दिला होता. आम्हाला राज्यभरातून आमच्या कार्यकर्त्यांचे फोन येत आहे. महायुतीत आपल्याला कोणत्याही प्रकारची विचारणा होत नाही, आपल्याला केवळ गृहीत धरले जात आहे. आपण त्याचा बदला घेतला पाहिजे. त्यासाठी निवडणूक लढवली पाहिजे अशी तक्रार करत आहे. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळत नसेल तर आम्ही निश्चितपणे वेगळा निर्णय घेऊ असे बच्चू कडू म्हणाले. प्रास्ताविक बैठकीत आम्ही भविष्यात कोणता व कसा निर्णय घ्यायचा हे ठरले जाईल. प्रहार संघटना गरज भासल्यास प्रत्येक मतदारसंघात आपला उमेदवार उभा करेल. त्यात शेतकरी, मजूर, गोरगरीब, वंचित व दलितांची मदत करणाऱ्या कणखर उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहून, असे बच्चू कडू यांनी यावेळी स्पष्ट केले. आमची महायुतीला मदत करण्याची तयारी होती. पण एकंदरीत असे दिसत आहे की, त्यांनाच आम्ही त्यांच्याबरोबर नको आहात, आम्हाला त्यांची गरज नाही असे असेल तर आम्ही आमचा झटका दाखवू. वेळ पडल्यानंतर दनकाही देऊ. आम्ही कोणत्याही पक्षावर अवलंबून नाही. राज्यात आमचे स्वातंत्र्य ताकत आहे. गरज भासल्यास आम्ही महायुती बाहेर पडू, ती वेळ आली नाही असे बच्चू कडू यावेळी म्हणाले. बच्चू कडू यांनी यावेळी अमरावतीच्या बैठकीत २९ मार्च रोजी नांदेड व आसपासच्या जिल्ह्याची बैठक होणार असल्याची माहिती दिली. नांदेड नंतर ३० मार्च रोजी औरंगाबाद, बीड व जालन्याची बैठक होणार आहे. असे ते म्हणाले, दरम्यान प्रत्येक मतदारसंघात”मी खासदार”हे अभियान राबवून ३०ते४०० उमेदवार उभे करण्याची घोषणा करून बच्चू कडू यांनी यापूर्वीच महायुतीची चिंता वाढवली आहे

Previous articleपवित्र महिना… रमजान
Next article२ कोटी रुपयांच्या धनादेशप्रकरणी कारवाईला गती द्या: शिक्षक बँकेच्या दोनशेवर खातेदारांचे पोलीस आयुक्तांना साकडे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here