Home सामाजिक पवित्र महिना… रमजान

पवित्र महिना… रमजान

417
0

आशाताई बच्छाव

IMG_20240321_191000.jpg

पवित्र महिना… रमजान

इस्लाम धर्मात पवित्र रमजानला अतिशय महत्व आहे.या महिन्यात अल्लाहची इबादत(उपासना) केली जाते.मुस्लिम बांधव या महिन्यात रोजे (उपवास) ठेवतात.या महिन्यात मुस्लिम बांधव कुराण पठण,नमाज यामार्फत अल्लाहची इबादत करतात.रमजानमध्ये रोजा या शब्दाला अरबी भाषेत ‘सोम’ म्हटले जाते.याचा अर्थ ‘थांबणे’ असा आहे.या महिन्यात रोजेदार दिवसभर अन्नपाणी घेत नाही.याकरीता मानसिक आणि शारीरिक संयम फार गरजेचा आहे.रोजा ठेवल्यामुळे मन एकाग्र व्हायला मदत मिळते.संपूर्ण रमजान महिना अतिशय पवित्र असा प्रार्थनामय आणि भक्तिमय झालेला असतो.रमजान महिना मांगल्याचे प्रतिक आहे.इस्लामी दिनदर्शिकेनुसार हा नववा महिना आहे.रमजान महिन्याचा पहिला दशक कृपेचा, दुसरा दशक क्षमेचा, तिसरा आणि शेवटचा दशक नरकापासून मुक्ततेचा मानला जातो.वर्षातील अकरा महिन्यांत मिळणारी नेकी (पुण्य)पेक्षा रमजानमध्ये मिळणारी नेकी ही सत्तर पटीने जास्त असते असे मुस्लिम बांधव मानतात.पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत उपवास केला जातो.पहाटेच्या जेवणाला सुहूर म्हटले जाते तर रात्रीच्या जेवणाला इफ्तार म्हटले जाते.पवित्र कुराणचे अवतरण याच महिन्यातील एका रात्री झाल्याने ही रात्र हजार रात्रींपेक्षा वरचढ ठरली आहे.या रात्रीत नमाज अदा करणे म्हणजे अल्लाहच्या समीप जाणे होय.
मुस्लिम बांधव जास्तीत जास्त नेकी कमविण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात संसार, व्यापार आदींचा त्याग करून अल्लाहला शरण जातात.एकमेकांमध्ये स्नेह वृद्धिंगत करणारा हा महिना असतो.रमजान म्हणजे बरकती आणि ईद म्हणजे आनंद.रमजान ईद या दिवसाला ‘ईद उल फित्र ‘ असेही म्हणतात.मुस्लिम बांधव या महिन्यात तीस दिवसांचे रोजे ठेवतात.त्यानंतर येणारी ईद चंद्रदर्शनाने साजरी केली जाते.मुस्लिम बांधव या दिवशी महिनाभर उपवास करण्याची ताकद दिल्याबद्दल अल्लाहचे आभार मानतात.रमजान महिन्यात दानधर्म केला जातो.ईदच्या दिवशी सकाळी नमाज अदा केल्यानंतर दहीभात खाल्ला जातो.त्यासोबतच खजूर खाण्याची प्रथा आहे.दुधात शेवया टाकून खीर बनवली जाते जिला शिरखुर्मा म्हणतात.
रमजानचा मूळ उद्देश पुण्य कमवणे असा आहे.मनामनातील दरी कमी करून आपापसात स्नेह वृद्धिंगत करणारा हा महिना आहे.माणसाला वाईटापासून दूर ठेवणारा हा महिना आहे.या महिन्यात चंद्राची मुस्लिम बांधव आतुरतेने वाट बघत असतात.तीस दिवस कडकडीत रोजे पाळल्याने उपासधारकांच्या तनमनाची शुध्दी होते.म्हणून इस्लाम धर्मात रमजानला खूप महत्त्व आहे.अल्लाहच्या प्रसन्नतेची,विशालतेची साक्ष देणारा महिना म्हणूनही या महिन्याचे महत्त्व आहे.या महिन्यातल्या इबादतीचा असर काही वेगळाच असतो.

लैलेशा भुरे
नागपूर

Previous articleमी.. कविता
Next articleराज्यात”प्रहार ची”स्वातंत्र्य ताकद: वेळ पडल्यास आम्ही महायुतीला झटका देऊ, प्रहार संघटनेचेआ. बच्चू कडू यांचा इशारा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here