Home गडचिरोली देलनवाडीच्या सरपंचपदी शेकापच्या प्रियंका कुमरे

देलनवाडीच्या सरपंचपदी शेकापच्या प्रियंका कुमरे

25
0

आशाताई बच्छाव

IMG_20231230_053119.jpg

 

देलनवाडीच्या सरपंचपदी शेकापच्या प्रियंका कुमरे

आरमोरी, गडचिरोली ,(सुरज गुंडमवार): तालुक्यातील देलनवाडी ग्रामपंचायतची शुक्रवारला सरपंचपदासाठी निवडणूक पार पडली. सदर निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या प्रियंका रोहिदास कुमरे यांनी सात विरुद्ध दोन अशी आघाडी घेवून सरपंच पदाची निवडणूक जिंकली.

देलनवाडी, नागरवाही, कोसरी या तीन गावांची गट ग्रामपंचायत असलेल्या नऊ सदस्यीय देलनवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच पद अविश्वास ठराव मंजूर झाल्याने रिक्त होते. त्यासाठी झालेल्या निवडणुकीत प्रियंका रोहिदास कुमरे यांना ग्रामपंचायत सदस्य इना मेश्राम, मुनिचंद मडावी, शुभांगी मसराम, राजेंद्र पोटावी, त्रिलोक गावतुरे, अश्विनी गरमळे या सात सदस्यांनी हात उंचावून मतदान केले.

प्रियंका कुमरे या देलनवाडीच्या सरपंच झाल्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जयश्रीताई वेळदा, जिल्हा सहचिटणीस रोहिदास कुमरे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, अशोक किरंगे, डॉ. गुरुदास सेमस्कर, क्रीष्णा नैताम, तुळशीदास भैसारे, पांडुरंग गव्हारे, बाजीराव आत्राम, गंगाधर बोमनवार, दामोदर रोहनकर, देवेंद्र भोयर, सुरज ठाकरे, चंद्रकांत भोयर, तितिक्षा डोईजड, ॲड. नर्गिस पठाण, निशा आयतूलवार, कविता ठाकरे, सुनिता पदा, रेश्मा रामटेके, विजया मेश्राम आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous articleमहिलांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन सक्षम आणि स्वावलंबी बनावे.:- सौ. योगिताताई पिपरे
Next articleजिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी ईजि.विश्वंभर पवार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here