Home नांदेड उपजिल्हा देगलुर नगरवासीयांच्या वतीने नादुरुस्त रस्त्यात वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल… जनसेवक...

उपजिल्हा देगलुर नगरवासीयांच्या वतीने नादुरुस्त रस्त्यात वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल… जनसेवक धनाजीराव यांचा प्रशासनाला इशारा…

192
0

आशाताई बच्छाव

IMG_20231201_040554.jpg

उपजिल्हा देगलुर नगरवासीयांच्या वतीने नादुरुस्त रस्त्यात वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल… जनसेवक धनाजीराव यांचा प्रशासनाला इशारा…

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी देगलुर येथील धुंडा महाराज संकुलन, श्री गुंडागुरुधाम गार्डन रस्त्यालगत दिवे गेले सहा महिने बंदावस्थेत आहेत. गार्डन च्या शेजारी कचऱ्याचे साम्राज्य. स्वच्छता केलेली नाही. मुख्याधिकाऱ्यांचे कामांकडे दुर्लक्ष याबाबत मुख्याधिकाऱ्यांना वारंवार आठवण करून सुद्धा याची दुरुस्ती झाली नाही. एका बाजूने शहर सौदर्यीकरणामध्ये उपजिल्हा देगलुर (देवग्राम) पालिका राज्य पुरस्कार घेत आहेत, त्याच देवग्राम येथील पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शहराचे सौंदर्य बिघडण्याचे काम होत आहे, अशी टीका देवग्राम नगरीचे नागरीकांमधून व विविध माध्यमातून करताना दिसत आहे. देवग्राम नगरीचे जनसेवक श्री. धनाजीराव जोशी यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राज्यस्तरीय राजमार्ग असल्याने या गार्डन लगतच्या रस्त्याची दुर्दशा झालेली आहे व दयनीय अवस्था आहे. रस्त्यात मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी गुरुतागद्दी शीख उत्सव काळात पथदिवे व रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात आले होते. पण आत्ताच्या कालावधीमध्ये सुशोभिकरण आणि त्यामुळे संतांची भुमी असलेल्या संतांचा वारसा लाभलेल्या धुंडामहाराज मठ, पाताळ गंगा व जवळच असलेल्या ईतिहास कालीन होट्टल मंदिर व येरगी येथील मंदिर तसेच बारव पर्यटनदृष्ट्या शहराच्या सौंदर्यात भर पडत असुन देवग्राम शहर हे त्रिवेणी संगम असुन तिन राज्यांचा संपर्क असुन एक ऐतिहासिक शहर आहे, अशा या मोक्याच्या ठिकाणी व शहराच्या मध्यवर्ती भागातील महत्वाचे राजमार्ग रस्त्याची मात्र दयनीय अवस्था झाली असुन बरेचसे अपघात होत असुन जीव मुठीत धरून येजा करावे लागते. १०० मिटर वरच देगलुर चे महाविद्यालय आहे व तेथील विद्यार्थी यांचे दररोज येजा चालु असते. विद्यार्थ्यांचे पालकांमध्ये मात्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपले पाल्य घरी सुरक्षित येई पर्यंत पालकांमध्ये भिती राहत असुन दररोज या भितीचा सामना पालकांना करावा लागत आहे.
आपले शहर उपजिल्हा असुन देगलुर (देवग्राम) नगरीचे आजी – माजी विद्यमान आमदार यांचे निवासस्थान आहे. पण त्यांचे या विषयावर लक्ष नसुन वारंवार नागरीक संपर्क करुन देखील यागोष्टींकडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष करत आहेत. नगरवासियांना त्रास सहन करावा लागत असुन रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. व मृत्यू चे उघडे द्वार यमद्वार – डोळ्यासमोर दिसत आहे. पथदिवे बंद, गुंडागुरुधाम गार्डनच्या लगत डेकोरेटिव्ह लाईट बंद, कचऱ्याची झाडलोट केली जात नाही आणि केली तर महिनोंमहिने कचरा उचलला जात नाही. झाडांना नियमित पाणी लावले जात नाही. जनसेवक धनाजीराव जोशी यांच्या संपर्कातून बर्‍याच वेळा गार्डन लगत कचरा साफसफाई केली होती. म्हणून थोडं फार अस्तित्व टिकून राहिले आहे. पर्यटकांना आकर्षणाबरोबरच देगलुर नागरीकांना एक विरंगुळा ठिकाण म्हणून असणारे हे धुंडा महाराज संकुल व समोरच गुंडागुरुधाम गार्डन आज ओस पडल्यासारखे आहे. आज प्रत्येक मंदिरकडील सुशोभिकरणाची स्वच्छतेअभावी हीच स्थिती आहे. जनसेवक धनाजीराव जोशी यांनी रस्त्याची दुरुस्ती चे कामे व कचर्‍याचे साफसफाई करण्याबाबत वारंवार कळवूनही यावर कुठलीही कार्यवाही न केल्याने शेवटी स्वखर्चाने हे काम करण्याची वेळ सामान्य नागरीक व जनसेवक यांच्या वर आले असल्याचे दिसुन येत आहे. असे जनतेतून चर्चेला उधाण आले आहे. डेकोरेटिव्ही लाईट बसविण्यात आल्या पण लाईट चे उजेड नाही, त्यांच्या कव्हर अद्यापपर्यत बसविण्यात आलेल्या नाहीत. नुसते सुशोभीकरण करून चालत नाही तर त्याची दुरुस्ती आणि देखभाल पण तेवढीच गरजेची आहे. मुख्याधिकारी हे सकारात्मक काम करणारे, शिस्तप्रिय आणि त्या शहराच्या विकासाचा ध्यास असणारा असायला हवेत. कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे कमी जास्त प्रमाणात आपल्या शहराची विकास कामे, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी धडपडत असतात. मग त्यात त्यांचा राजकीय हेतू असो किंवा समाजसेवेची मुळात असलेली आवड असो. पण, यासाठी प्रशासकीय साथ महत्वाची असते. यासाठी प्रशासन प्रमुख म्हणून असणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरच शहराचा विकास अवलंबून असतो. बऱ्याच मुख्याधिकाऱ्यांना शहराच्या विकासाचे काहीही देणंघेणं नसते. ते फक्त आपला नगर परिषदेच्या ३ वर्षाचा कालावधी कसाबसा संपविण्याच्या मानसिकतेत असतात. यापूर्वी लाभलेले काही चांगले शहराच्या विकासासाठी धडपडणारे व उत्कृष्ट कामगिरी करणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतके क्वचितच मुख्याधिकारी असतात. ज्यांना स्वतःहून नगर परिषदेच्या विकास कामाबद्दल आस्था असते. कायद्याचे परिपूर्ण ज्ञान असते, कर्मचारी याच्यावर कामाचा वचक असतो. सध्या शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी नगर परिषदेला प्राप्त होत आहे. फक्त गरज आहे ती तत्कालीन मुख्याधिकारी व देगलुर चे कर्तव्यदक्ष राजकारणी असे मत ही शिवसेनेचे नेते जनसेवक श्री. धनाजीराव जोशी यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान यासंदर्भात येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. व शहरातील अनेक सुशोभीकरणाच्या कामांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असुन शहराच्या तिन राज्यांचा संपर्क होणार्‍या प्रवेशद्वाराजवळील परिसर आकर्षक दिसावा यासाठी देगलुर (देवग्राम) संतांची जन्म भुमी असल्याने येथे बसण्यासाठी कट्टे व आकर्षक डेकोरेटिव्ही लाईटचे काम अपूर्ण असून लवकरात लवकर बसविण्यात यावे यासाठी शिवसेनेचे नेते जनसेवक धनाजीराव जोशी यांचे प्रयत्न सुरू असुन नगर परिषद कार्यालयात व स्थानिक पातळीवर तसेच वरीष्ठ पातळीवर निवेदनाद्वारे शहरातील सुशोभीकरण, पथदिवे व रस्त्याची दयनिय अवस्था बाबत, रस्त्यातील खड्डे बुजवून रस्ता वाहतुकयोग्य करावा असे कळवून लवकरात लवकर शिष्टमंडळाची बैठक घेऊन नागरीकांना व पथकरी यांना होणारे त्रासातून मुक्त करावे व लवकर काम सुरू करण्यात यावे यासाठी मी ही स्वतः प्रयत्न करणार व निवेदनाद्वारे संपर्क करणार असल्याचे जनसेवक धनाजीराव जोशी यांनी यावेळी नगरवासीयांना सांगितले आहे. सत्तेतील व विरोधी पक्षातील सर्व राजकीय नेते आपापले राजकिय मतभेद बाजूला ठेवून एकत्रित येऊन शहरविकास संदर्भात चर्चा करुन लक्ष देणे गरजेचे आहे असे वक्तव्य व आवाहन जनसेवक धनाजीराव जोशी यांनी केले आहे. या विषयावर प्रशासन लवकरात लवकर लक्ष केंद्रित न केल्यास कोणतीही पूर्व सुचना न देता रस्त्यात पडलेल्या खड्डयांमध्ये देगलुर चे सर्व राजकीय पक्षाचे नेते व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील नागरीक व नगरवासियांतर्फे जाहीरपणे वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल. याबाबतची कोणत्याही प्रकारची कायदेशीरबाब निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील. असा इशारा देगलुर शिवसेनेचे नेते जनसेवक धनाजीराव जोशी यांनी प्रशासन, स्थानिक, वरिष्ठ अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदनाव्दारे देणार असल्याचे सांगितले आहे.

Previous articleबस स्टॅन्डवर खुलेआम लघुशंका करणाऱ्या 9 जनावर लोहा पोलिसात गुन्हे दाखल.
Next articleअखेर मंत्री भुजबळ मराठा समाजाच्या प्रचंड विरोधानंतर अर्धवट दौरा सोडून गेले निघून—
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here