Home नाशिक अखेर मंत्री भुजबळ मराठा समाजाच्या प्रचंड विरोधानंतर अर्धवट दौरा सोडून गेले निघून—

अखेर मंत्री भुजबळ मराठा समाजाच्या प्रचंड विरोधानंतर अर्धवट दौरा सोडून गेले निघून—

85
0

आशाताई बच्छाव

IMG_20231201_040932.jpg

अखेर मंत्री भुजबळ मराठा समाजाच्या प्रचंड विरोधानंतर अर्धवट दौरा सोडून गेले निघून—

येवला विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांचा एल्गार ‘भुजबळ गो बॅक’

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

बे मोसमी पाऊस व गारपिटीने नाशिक जिल्ह्याला जोडपून काढले असून या गारपिटीने निफाड तालुक्यातील बहुतांश गावांमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली असून द्राक्ष बागांचे 100% नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ पहाणी दौऱ्यासाठी आपल्या येवला विधानसभा मतदारसंघात आले असता मराठा समाजाच्या प्रखर विरोधानंतर “भुजबळ गो बॅक, आमचे ७/१२ आमच्या नावावर आहे ,आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाही तुम्ही परत जा” अशा घोषणा देत काळे झेंडे दाखवून निषेध करत त्यांना आपला दौरा अर्धवट सोडून निघून जावे लागले अशी एकंदरी स्थिती या मतदार संघातील मराठा समाजाने केली आहे.
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे तसेच फळबागांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे येवला लासलगाव मतदार संघातील गावांचा दौरा करण्यासाठी मंत्री भुजबळ येवल्यात आले असून सुरवातीला ‘मला अडवून दाखवा’ असे म्हणणाऱ्या मंत्री भुजबळ यांनी मराठा समाजाच्या प्रचंड रोषामुळे ‘ज्या गावातील ग्रामस्थांना नको असेल तर जाणार नाही’ अशी भूमिका घेतली. मात्र त्यांच्या दौऱ्यात मराठा समाजाचा प्रचंड रोष बघता त्यांना दौरा अर्धवट सोडावा लागला.
काल दि.२९ रोजी रात्री भुजबळ येवला मुक्कामी होते. मात्र तेथील संपर्क कार्यालयाला प्रचंड असा अतिरिक्त बंदोबस्त होता. काल झालेल्या पत्रकार परिषदेत भुजबळ यांनी, ‘ मी दौरा करणारच असून मला अडवून दाखवा’ असे आवाहन केले होते मात्र, आज सकाळी येवल्याच्या विंचुर चौफुली जवळ मराठा कार्यकर्ते जमा झाल्याचे पाहून त्यांना मार्ग बदलावा लागला. तालुक्यातील सोमठाणा देश या गावात त्यांचा आज पाहणी दौरा होता मात्र, रात्रीपासून तेथे कार्यकर्ते जमा झाले होते. तेथील मराठा कार्यकर्त्यांनी काल भुजबळ यांना दूरध्वनी करून, ‘जमिनीचे उतारे आमच्या बापाच्या नावाने असून आम्हाला मदत मिळाली नाही तरी चालेल मात्र तुम्ही आमच्या गावाला येऊ नका’ असे आवाहन केले. ही ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली. त्यानंतर आज सोमठाणे येथील दौऱ्यात मराठा कार्यकर्त्यांनी भुजबळ यांना काळे झेंडे दाखवत प्रचंड अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे भुजबळ यांना तेथे थांबता आले नाही. भुजबळ यांचा ताफा गेल्यानंतर मराठा कार्यकर्त्यांनी मार्ग गोमुत्र शिंपडून पवित्र केला. भुजबळ यांना येवला लासलगाव मतदार संघातील निफाड तालुक्यातील गावांमध्येही मराठा समाजाच्या रोषास सामोरे जावे लागले. येवला तालुक्यातून निफाड तालुक्यातील कोटमगावकडे आल्यानंतर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भुजबळांना काळे झेंडे दाखवले. त्यानंतर, ‘भुजबळ गो बॅक’ च्या घोषणा दिल्या. या कार्यकर्त्यांनी ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी कार्यकर्त्यांना भोवतीकडे केले होते. त्यामुळे ताफा पुढे जाताच कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडत पुढे जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. मराठा समाजाचा प्रचंड रोष बघता मंत्री छगन भुजबळ हे अर्धवट दौरा सोडून शहापूर कडे रवाना झाले. मराठा समाजाचा ठिकठिकाणी होणाऱ्या आंदोलनानंतर भुजबळांनी दौरा गुंडाळल्याची चर्चा आहे. येवल्यानंतर निफाड तालुक्यात छगन भुजबळांचा पाहणी दौरा होता. पण, ते ओबीसी समाजाच्या शहापूर मधील आंदोलनाला भेट देऊन कर्जत येथे होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यक्रमासाठी भुजबळ रवाना झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here