Home अमरावती माय-लेकाने घेतली विष, दोघांचाही मृत्यू; उदरनिर्वाह याच्या वढाताणीने गाठले टोक. एक वर्षांपूर्वी...

माय-लेकाने घेतली विष, दोघांचाही मृत्यू; उदरनिर्वाह याच्या वढाताणीने गाठले टोक. एक वर्षांपूर्वी पतीचे दुर्धर आजाराने निधन.

112
0

आशाताई बच्छाव

IMG_20231201_041443.jpg

माय-लेकाने घेतली विष, दोघांचाही मृत्यू; उदरनिर्वाह याच्या वढाताणीने गाठले टोक.
एक वर्षांपूर्वी पतीचे दुर्धर आजाराने निधन.
————–
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख.
अमरावती विभागीय संपादक.
अमरावती.
एक वर्षांपूर्वी पतीचे दुर्धर आजाराने मृत्यू झाल्यानंतर तिने मुलांच्या संगोपनासाठी कष्ट घेतले. मात्र परिस्थितीच्या रेटाने तिचा निर्धार
डळमळती झाला. आणि विषयाचा प्याला जवळ करीत तिने स्वतःला संपविले व मुलालाही तिने विष दिले. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरच्या या दोघांना वाचविण्याची धडपड व्यर्थ ठरली. माय लेकीच्या मृत्यूने अमरावती येथील हमालपुरा परिसर हादरला गेला आहे. पोलीस सूत्रानुसार, योगिता गजानन वाघाडे (वय ३५ हमालपुरा अमरावती) व अथर्व गजानन वाघाडे (वय १२) अशी मृतांची नावे आहेत. अमरावती राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हमालपूर येथे मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. योगी तिच्या पतीचे वर्षभरापूर्वीच दुर्धर आजाराने निधन झाले होते. त्यामुळे योगीतावर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली ती अंग मेहनत करून मुलाचे संगोपन करीत होती. मंगळवारी शेजाऱ्यांना ती निदर्शनास न आल्याने त्यांनी घरात डोकावले. त्यावेळी योगी तिच्या तोंडातून फेस येत असल्याचे आढळले. शेजाऱ्यांनी मिळून योगी तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने उपचार त्यांना अति दक्षता विभागात नेण्यात आले. तातडीने सलाईन लावून उपचार सुरू करण्यात आले. योगिता वर उपचार केले जात असताना अथर्वला ही भवानी येत असल्याचे निदर्शनात आले. त्यामुळे घटनास्थळी उपस्थित डॉक्टरांनी संशय वरून त्याची चौकशी केली असता, योगिता ने त्याला द्रव्य त्याला दिले होते, असे त्याने सांगितले. तथापि, तोपर्यंत विषयाचा अंमल त्याच्यावरही पूर्णपणे झाला होता. त्याला तातडीने ओपीडीमध्ये दाखल करून सलाईन आणि ऑक्सिजन देण्यात आले. या मालिकेला वाचण्यासाठी सर्व तोपरी प्रयत्न करण्यात आले मात्र उच्च दरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. पुढील चौकशी राजापेठ पोलीस स्टेशन अमरावती करीत आहे.

Previous articleअखेर मंत्री भुजबळ मराठा समाजाच्या प्रचंड विरोधानंतर अर्धवट दौरा सोडून गेले निघून—
Next articleअवैद्य सावकारी, साई नगरातील गुरुजींच्या घरी सहकार विभागाची धाड; अचलपूर सहाय्यक निबंध काकडील तक्रार.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here