Home मुंबई सेवाभावी वृत्तीने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करणार्‍या संस्थांचा सन्मान व...

सेवाभावी वृत्तीने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करणार्‍या संस्थांचा सन्मान व गौरव सोहळा

104

आशाताई बच्छाव

IMG_20240111_172502.jpg

सेवाभावी वृत्तीने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करणार्‍या संस्थांचा सन्मान व गौरव सोहळा

मुंबई : युवा मराठा प्रतिनिधी विजय पवार
महानगर पालिकेच्या नायर रुग्णालयाच्या रक्त केंद्राने दिनांक १०/१/२०२४ रोजी रक्तदान शिबीर आयोजकांचा सन्मान व गौरव सोहळा आयोजित केला होता.या सन्मान सोहळ्यात १६० रक्तदान शिबीर आयोजकांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त श्री. डी. आर गहाणे,राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डाॅ. महेंद्र केंद्रे आणि नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ सुधीर मेढेकर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नायर रुग्णालय रक्त केंद्राचे समाज विकास अधिकारी श्री कांतीलाल पवार, रक्त केंद्र प्रमुख डाॅ ललिता पाटील आणि विक्रूती शास्त्र विभागाच्या प्रमुख डाॅ कुसुम जशनानी,रक्त संकलन अधिकारी डॉ नितिन वलवी ,डॉ मयूरा केकान तसेच सर्व रक्त केंद्र कर्मचारी आधिकारी डॉ यांनी खुप मेहनत घेतली.

Previous articleहिट अँड रन कायद्या अंतर्गत इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी संप पुकारला
Next articleलोकसभा विधानसभेच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर वर घ्या- बसपा साकोली विधानसभेची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.