Home भंडारा लोकसभा विधानसभेच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर वर घ्या- बसपा साकोली विधानसभेची...

लोकसभा विधानसभेच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर वर घ्या- बसपा साकोली विधानसभेची मागणी

61
0

आशाताई बच्छाव

IMG_20240111_172734.jpg

लोकसभा विधानसभेच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर वर घ्या- बसपा साकोली विधानसभेची मागणी

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी )बहुजन समाज पार्टी साकोली विधानसभेच्या वतीने लोकसभा विधानसभा,महानगरपालिक, नगरपालिका,ग्रामपंचायतीच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या या विषयाच्या अनुसंघाने मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय दंडाधिकारी साकोली यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. ईव्हीएम मशीन हे मानवा द्वारे चालवणारे मशीन असून हे केव्हाही हॅक केलेले जाऊ शकते. ईव्हीएम वर अनेक राजकीय पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून अनेक प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत म्हणून पुढील होणाऱ्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या या विषयाचे निवेदन मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आले.
निवेदन देताना स्वप्निल गजभिये विधानसभा अध्यक्ष, कार्तिक मेश्राम कोषाध्यक्ष, छोटेलाल गेडाम महासचिव, मनोज कोटांगले, गुलजारीलाल बनसोड, नितीन रामटेके सर,रोशन गजभिये, खेमराज माटे, विजय साखरे , देवचंद भांगडकर, कल्याण भैसारे, रंजित जांभुळकर, शहाजान बोकडे, शरद बडोले, देवचंद भागडकर, युवराज पारधी, अमन बांबोडे, सुरज पूसतोडे, हरेश्वर भागडकर, संदीप भागडकर, नीताराम कान्हेकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here