Home वाशिम दिव्यांगांच्या आरक्षीत भूखंडावरील अवैध अतिक्रमण हटविण्यासाठी रुद्र अपंंग संघटनेची आंदोलनाची हाक

दिव्यांगांच्या आरक्षीत भूखंडावरील अवैध अतिक्रमण हटविण्यासाठी रुद्र अपंंग संघटनेची आंदोलनाची हाक

273
0

आशाताई बच्छाव

IMG_20240111_181756.jpg

दिव्यांगांच्या आरक्षीत भूखंडावरील अवैध अतिक्रमण हटविण्यासाठी रुद्र अपंंग संघटनेची आंदोलनाची हाक
जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषणाचा इशारा
वाशिम,,(गोपाल तिवारी)- शहरातील सिव्हील लाईन भागात दिव्यांगांना रोजगारासाठी शासनाने आरक्षीत केलेल्या भूखंडावरील अवैध व अनाधिकृत अतिक्रमण हटविण्यासाठी रुद्र अपंग संघटनेने आंदोलनाची हाक दिली असून अवैध अतिक्रमण त्वरीत हटवा अन्यथा येत्या २४ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करण्यात येईल असा इशारा १० जानेवारी रोजी संघटनेचे अध्यक्ष संतोष व्यास यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
निवेदनात नमूद आहे की, दिव्यांगांना स्वयंरोजगारांसाठी शासनाने विविध क्षेत्रात आरक्षण लागु केले आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांकडून लिजवर देण्यात येणार्‍या व्यापारी संकुलातील दुकानांमध्येही अपंगांना आरक्षण लागु करण्यात आले आहे. मात्र वाशिम नगर परिषद हद्दीत येत असलेल्या सिव्हील लाईन भागातील कुक्कूट पालन केंद्राजवळ आणि पशुसंवर्धन कार्यालयानजीक असलेले भूखंड दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी आरक्षीत करण्यात आल्याची ठोस माहिती आहे. मात्र संबंधीत भूखंडावर तेथील परिसरात राहणार्‍या नागरीकांडून निवासी अतिक्रमण होत आहे. व या शासकीय भूखंडाचा अवैधरित्या ताबा मिळविला जात आहे. या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून संबंधीत अधिकारी या प्रकाराकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करुन संबंधीत लोकांना पाठीशी घालत असल्याचा संशय येत आहे. तरी दिव्यांगांसाठी आरक्षीत असलेल्या या भूखंडावरील अनाधिकृत कब्जा, ताबा व अतिक्रमण त्वरीत काढून सदर भूखंड दिव्यांगांना देण्यात यावे. अन्यथा संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरु करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतांना रूद्र अपंग संघटनेचे अध्यक्ष संतोष व्यास, विदर्भ अध्यक्ष जय चव्हाण, जिल्हा संघटक विलास वर, रामेश्वर महाजन, वाजिदा बी, केशव कांबळे, राजेश गोरे, उमेश चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा अनिता राठोड उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here