Home विदर्भ मालेगाव शहरात अवकाळी वारा व पावसाने गरीब कुटूबातील अनीता अहीर कुटुंबीयांचे अतोनात...

मालेगाव शहरात अवकाळी वारा व पावसाने गरीब कुटूबातील अनीता अहीर कुटुंबीयांचे अतोनात नुकसान झाले असून पहिलेच कर्जाचा डोंगर उभा करुन घर बांधले

278

राजेंद्र पाटील राऊत

मालेगांव येथे वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाली ” झाडे तुटन पडल्याने वीज पुरवठा खंडीत

मालेगाव शहरात अवकाळी वारा व पावसाने गरीब कुटूबातील अनीता अहीर कुटुंबीयांचे अतोनात नुकसान झाले असून पहिलेच कर्जाचा डोंगर उभा करुन घर बांधले

मालेगांव : (प्रकाश जैन भुरे तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) –मान्सूनपूर्व पावसासह वादळी वारे शनिवार २९मे रोजी सायंकाळी मालेगांव व परिसरात आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली असुन परीसरातील लोकाचे खुप नुक्सान झाले. रस्त्यावर मोठ- मोठी झाडे तुटून पडली . विजेच्या तारा तुटल्याने विजेचा लपनडाव रात्र भर सुरु होता . मालेगांव शहरात व परिसरात अचानक गुरुवार २९ मे रोजी सायंकाळी जोरदार वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली . या अचानक आलेल्या वादळी वारा आणि पावसाने नागरिकांची मोठ्या प्रमाणात
तारांबळ उडाली . जवळपास पाउन तास या वादळी वाऱ्याने गंभीर रुप धारण केले . अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली व काहीचे घरावरील पत्रे चक्क नींबाच्या 35 फुट उच झाडा वर उडाली व अटकली. तसेच अनेक मोठ मोठे झाडे पडली . विशेष म्हणजे या वादळी वाऱ्याने विज पुरवठा करणारे खांब , तारा तुटुन पडल्याने महावितरणचे
देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . यामुळे मालेगाव व परिसरातील विज पुरवठा देखील खंडीत झाला होता . सध्या शेतकरी भुईमूग पिक काढीत असुन या वादळी वाऱ्याने शेतकयांचे देखील नुकसान झाले