Home माझं गाव माझं गा-हाणं जाचक तफावतीमुळे संस्थाना कर्जपुरवठा नाही खरीप हंगामात कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग...

जाचक तफावतीमुळे संस्थाना कर्जपुरवठा नाही खरीप हंगामात कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल..!सर्वत्र शेतकऱ्यात तीव्र संताप!!

367
0

राजेंद्र पाटील राऊत

जाचक तफावतीमुळे संस्थाना कर्जपुरवठा नाही
खरीप हंगामात कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकरी
वर्ग हवालदिल..!सर्वत्र शेतकऱ्यात तीव्र संताप!!
(श्रीमती आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक युवा मराठा न्युज)
मालेगांव,दि.१- दरवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सहकारी सोयायटींच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला पीककर्ज वाटप केले जाते.मात्र यावर्षी जिल्हा बँकेच्या किचकट व क्लेशदायी निर्णयामुळे शेतकरी वर्ग पीककर्जापासून वंचीत राहतो की काय?अशी भिती वाढल्यामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.
या देशाचा आर्थिक कणा म्हणून शेती व्यवसायाकडे बघितले जाते.मात्र जिल्हा बँकेने लादलेल्या अनाठायी निर्णयामुळे शेतकऱ्यांना पीककर्जापासून वंचीत रहावे लागणार असल्याची परिस्थिती निर्माण झाल्याने,मालेगांव तालुक्याच्या दक्षिण भागातील शेतकरी वर्गात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकामार्फत प्रत्येक वर्षी विविध कार्यकारी सहकारी सोसायटयांना पीककर्जसाठी आर्थिक पुरवठा केला जातो.मात्र यावर्षी कोरोना महामारी सारखे संकट असतानाही,जिल्हा मध्यवर्ती बँकाकडून शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप न करण्याचा व पीककर्ज मंजूर न करण्याचा तालीबानी फतवा बँक प्रशासनाकडून काढण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडून चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
वास्तविक कौळाणे (नि.),सोनज,टाकळी,मांजरे,सौंदाणे,शिंरसोंडी,सावकारवाडी,झाडी,एरंडगाव,चोंढी,जळगांव (नि.) चौकी,घोडेगाव,मेहुणे,निमगांव ,निंबायती ज्वार्डी या भागातील शेतकरी वर्ग विशेषतः संतप्त झालेला असून,अगोदर कर्जवसूलीच्या नावाखाली जिल्हा मध्यवर्ती बँकानी थकबाकीदार शेतकऱ्याकडून भरमसाठ वसूली करुन घेतली,आणि आता घुमजाव करुन पीककर्ज नाकारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर पाने पुसण्याचाच हा प्रकार लाजीरवाणा असल्याच्या प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी “युवा मराठा न्युज”शी बोलताना व्यक्त केल्यात.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या अवसानघातकी निर्णयामुळे शेतकरी वर्ग नाहक भरडला जाणार असून,गावागावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटयांना त्यामुळे काहीच महत्त्व राहणार नाही,अशाही भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्यात.तर खरीप हंगामाच्या तोंडावर आता कृषीमंत्र्यानीच यावर तोडगा काढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here