Home कोल्हापूर मौजे वडगावसाठी लागणाऱ्या सहकार्यास मी तत्पर आहे, दलितमित्र डाँ.अशोकराव माने

मौजे वडगावसाठी लागणाऱ्या सहकार्यास मी तत्पर आहे, दलितमित्र डाँ.अशोकराव माने

206
0

कोल्हापूर  : मौजे वडगाव येथे ग्रामपंचायत व लोकसहभागातून संस्थात्मक विलगीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून गाव कोरोनामुक्त होण्यासाठी मदत होणार आहे. ग्रामस्थांनी कुटुंबाची आणि गावाची काळजी घ्या तसेच गावासाठी लागणाऱ्या सहकार्यास मी तत्पर आहे. असे मत जि. प .सदस्य दलितमित्र डॉ.अशोकराव माने यांनी व्यक्त केले. ग्रामपंचायत व लोकसहभागातून उभारलेल्या कोव्हिड विलगीकरण केंद्राचे उद्घाटन दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते संपन्न झाले.सरपंच काशिनाथ कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. गावातील या केंद्रासाठी नियोजन चांगले केले असून पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे मत सरपंच काशिनाथ कांबळे यांनी व्यक्त केले.यावेळी उपसरपंच सुभाषअकीवाटे ,माजी उपसरपंच किरण चौगुले, ग्रामसेवक प्रशांत मुसळे, तलाठी संदीप बरगाले, कोतवाल महंमद जमादार, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.वाघमोडे ,डॉ. विजयकुमार गोरड, डॉ. संगीता चौगुले, डॉ.एस जी पाटील, ग्रामपंचायत सदस्य अवधूत मुसळे,अविनाश पाटील, सर्जेराव सावंत, रामचंद्र चौगुले ,यांच्यासह मेडिकल असोसिएशन ,एम आर असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, कोरोना सनियंत्रण समितीचे पदाधिकारी आदी मान्यवरांसह ग्रामपंचायत सदस्य व अन्य सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleमालेगाव शहरात अवकाळी वारा व पावसाने गरीब कुटूबातील अनीता अहीर कुटुंबीयांचे अतोनात नुकसान झाले असून पहिलेच कर्जाचा डोंगर उभा करुन घर बांधले
Next articleअखेर इचलकरंजी नदीघाटाचे झाले सुशोभितकरण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here