• Home
  • 🛑 सरकार पडेल तेव्हा बघू ….! फडणवीसांचे वक्तव्य 🛑

🛑 सरकार पडेल तेव्हा बघू ….! फडणवीसांचे वक्तव्य 🛑

🛑 सरकार पडेल तेव्हा बघू ….! फडणवीसांचे वक्तव्य 🛑
✍️ मुंबई 🙁 साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

मुंबई :⭕ राज्यात गेल्या काही दिवसात राजकीय भूकंपाच्या घडामोडी सुरु असल्याचे अंदाज वर्तवले जात होते. ऑक्टोबर महिन्यात राजकीय भूकंपाचे भाकीत अनेक नेत्यांनी वर्तवले होते. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये असलेली धुसफूस, राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपशी असलेली गुपित जवळीक, काँग्रेसशी विरोधी विचारधारा असलेली शिवसेना हे सगळे मुद्दे बघता राजकीय हालचाली महत्वाच्या आहेत.

काल, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार संजय राऊत यांची भेट घडल्याचे समोर आले आणि एकच खळबळ उडाली. अनेक राजकीय नेत्यांसह तज्ञांनी वेगवेगळे अंदाज बांधण्यास सुरुवात केली.

मात्र, आता या ‘गुप्त’ बैठकीचे कारण खुद्द संजय राऊत यांनी स्पष्ट केले असून, कालची भेट ही गुप्त पासुन पूर्वनियोजित असल्याचं त्यांनी सांगितलं.

यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी “संजय राऊत यांनी माझी मुलाखत घेणार हे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांचा फोन आला होता. त्यामुळे मी काही अटी टाकल्या होत्या. त्यामुळे चर्चा करण्यासाठी राऊत यांची भेट झाली. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही आणि कारणही नाही” असा खुलासा केला आहे.

तर, “शिवसेनेसोबत कोणतीही चर्चा सुरू नाही, त्यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याची कोणतीही चर्चा केली नाही. त्यासाठी असे कोणतेही कारण नाही, जे सरकारचे काम सुरू आहे. त्यावर जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे.

त्यामुळे हे सरकार आपल्या कृतीमुळे कोसळेल, ज्यावेळी हे सरकार पडेल त्यावेळी आम्ही बघू पण सरकार बनवण्याची कोणतीही घाई भाजपला नाही, ” असं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिले आहे….⭕

anews Banner

Leave A Comment