• Home
  • *मुंबईत मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद;सप्टेंबरमध्ये सरकारला धक्का देणार!*

*मुंबईत मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद;सप्टेंबरमध्ये सरकारला धक्का देणार!*

*मुंबईत मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद;सप्टेंबरमध्ये सरकारला धक्का देणार!*
*मुंबई (विजय पवार-साईप्रजित मोरे युवा मराठा न्युज नेटवर्क)-* कोपर्डीच्या अत्याचारी घटनेनंतर संपूर्ण मराठा समाज संघटीत झाला.न भुतो न भविष्यती अशी क्रांती झाली.महाराष्ट्र बरोबरच देश विदेशातही मराठा क्रांती मोर्च निघालेत.तरीही कोपर्डीच्या ताईला अजूनही न्याय मिळालेला नाही.गुन्हेगारांना अद्यापही फाशी झालेली नाही.
आणि त्यातच रक्षाबंधनाच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातल्या तांबडी गावातल्या म्हाळदेंकर कुटूंबियातल्या चौदा वर्षिय मुलीवर लैगिंक अत्याचार करुन नंतर तिचा खून करण्यात आला,या घटनेने पुन्हा एकदा कोपर्डीची पुनरावृत्ती झाली.मात्र कुठल्याही राजकिय नेत्याने या घटनेची गंभीर दखल घेतलेली नाही.गेल्या चाळीस वर्षात मराठा समाजावर फक्त अन्यायच झालेला आहे.आणि आताच्या या घटनेत देखील मराठा समाजाचे अनेक आमदार मंत्री असताना त्यांनी तांबडी गावाला भेट देऊन या प्रकरणात न्याय देण्याबाबत कुठलीही ठोस भुमिका स्विकारलेली नाही.त्यामुळे येत्या २६सप्टेंबर पर्यत तात्काळ तांबडी व कोपर्डी प्रकरणात न्याय मिळाल्यास साठावा क्रांती मोर्चा तांबडी गावातुन निघेल व सरकारला धक्का देईल अशा स्वरुपाची घोषणा काल मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत राजन घाग यांनी केली.यावेळी पत्रकार परिषदेस क्रांती मोर्चाचे महाराष्ट्रातील पदाधिकारी व समनव्यक बहुसंख्येने हजर होते.

anews Banner

Leave A Comment